Samir Choughule: ‘उंदीर मांजर पकडींगो’ गाणं कसं सुचलं?, समीर चौगुलेंन सांगितली पडद्यामागची गोष्ट

Samir Choughule News: समीर चौगुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडींगो...’ या गाण्याची प्रचंड चर्चा झाली होती. हे गाणं त्यांना कसं सुचलं? यावर भाष्य केलं आहे. त्यांनी मुलाखतीत पडद्यामागची कहाणी सांगितली आहे.
Samir Choghule On Undir Manjar Pakdingo
Samir Choghule On Undir Manjar PakdingoInstagram

Samir Choghule On Undir Manjar Pakdingo

कायमच सोशल मीडियावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची प्रचंड चर्चा होते. अनेकदा विविध स्किटची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते. गेल्या काही दिवसांपूर्वी समीर चौगुले यांच्या स्किटची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. समीर चौगुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडींगो...’ या गाण्याची प्रचंड चर्चा झाली होती. त्यांच्यासोबत गाण्यामध्ये हास्यजत्रेतले काही कलाकार सुद्धा दिसत आहे. त्या गाण्यामुळे समीर चौगुले आणखीनच चर्चेत आले होते. समीर चौगुलेंनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांना हे गाणं त्यांना कसं सुचलं? यावर भाष्य केलं आहे. त्यांनी मुलाखतीत पडद्यामागची कहाणी सांगितली आहे.

Samir Choghule On Undir Manjar Pakdingo
Dharmendra Health News: धर्मेंद्रांची प्रकृती खालावल्याचं वृत्त, सनी देओलच्या नीकटवर्तीयांनी अमेरिकेला जाण्याचं सांगितलं कारण

नुकतंच समीर चौगुलेंनी ‘राजश्री मराठी’ या मराठी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत समीर चौगुलेंनी त्या गाण्याची गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. मुलाखतीत समीर चौगुलेंनी गाण्याविषयी सांगितले की, “मी कॉलेजमध्ये असल्यापासून खूप अवली आहे. त्या अवलीपणाला मी बालिशपणा असं म्हणेल. कॉलेजमध्ये असल्यापासून मला विचित्र आवाज काढण्याची खूप सवय होती. मी कधी प्राण्यांचे तर नाही पण, वेगवेगळ्या वस्तूंचे आवाज काढायचो. मी एनर्जी ड्रिंक उघडतानाचा आवाज, मोबाईलचा आवाज काढायचो, कुकरची शिट्टीचा आवाज काढून खूपवेळा आईला गोंधळात टाकायचो.”

मुलाखतीमध्ये समीर चौगुले पुढे म्हणाले, “ ‘ताल’ चित्रपटातलं एक गाणं आहे, ते गाणं मलाच नाही तर अनेकांना कळत नाही. गायक नेमकं काय बोलतोय, हे मला कळत नव्हतं. आपण गाणे तर चुकतो, पण आरत्याही चुकतो. अनेकदा फणीवर बंधनाच्या ऐवजी आपण अनेकदा फळीवर वंदनाच म्हणतो. आरतींप्रमाणेच आपण अनेक गाणेही चुकतो. त्या चित्रपटातलं गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात उंदीर मांजर पकडींगो ही ओळ डोक्यात आली. म्हणून मी ते गाणं पटकन लिहिले. सहज लिहिलेल्या गाण्याला प्रेक्षकांकडून इतका प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नव्हती. आता ‘उंदीर मांजर पकडींगो’नंतर येत्या काही दिवसामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला ‘लोचन मजनू’ हे गाणं येणार आहे. ते गाणं सुद्धा नेटकऱ्यांना प्रचंड आवडेल याची मला आशा आहे.”

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘शिवाली अवली कोहली, लवली अवली कोहली’ हे गाणं देखील प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यामुळे समीर चौघुलेसह नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांची प्रचंड चर्चा झाली होती. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. नेटकऱ्यांकडून या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

Samir Choghule On Undir Manjar Pakdingo
Jawan Box Office Collection Day 5: 'जवान'चा 5 व्या दिवशी वेग मंदावला, तरीही मोडले ४ रेकॉर्ड

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com