Kangana Ranaut : अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर कंगना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत चांगलंच सुनावलं

Kangana Ranaut News : एका सभेमध्ये कंगनाने स्वत:ची तुलना थेट बिग बींसोबतच केली होती. तिचं हे विधान अनेकांना खटकलं. या विधानावर अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
Kangana Ranaut News
Kangana Ranaut NewsSaam Tv

सध्या बॉलिवूड क्वीन कंगना रणौत लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आली आहे. कंगना हिमाचल प्रदेशमधील मंढीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. सध्या अभिनेत्री आपल्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. एका सभेमध्ये कंगनाने स्वत:ची तुलना थेट बिग बींसोबतच केली होती. तिचं हे विधान अनेकांना खटकलं. या विधानावर अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

Kangana Ranaut News
Renuka Shahane Post : "....तर त्यांना मत देऊ नका"; 'नोकरीत मराठी माणूस नको'च्या पोस्टनंतर रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

कंगनाने इन्स्टा स्टोरीवर एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यावर तिने कॅप्शन लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिलंय की, " मी पोस्टमध्ये स्पष्टपणे भारत आणि त्यातील राज्यांचा समावेश केला होता, तिथे माझ्या कामासोबतच माझ्या राष्ट्रप्रेमाबद्दल माझे कौतुक केले जाते. फक्त माझ्या अभिनयाचेच नाही तर, तर मी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. ज्यांना माझ्याबद्दल आक्षेप आहे त्यांना माझा एक प्रश्न आहे. बिग बी नंतर, मी नाही तर भारतात हिंदी चित्रपटांत सर्वात जास्त प्रेम आणि आदर कोणाला मिळतो? खान? कपूर? कोण? कृपया मलाही कळू द्या"

Kangana Ranaut Post
Kangana Ranaut PostSaam Tv

कंगना गेल्या आठवड्यात एका निवडणूक रॅलीत म्हणाली होती, 'मी राजस्थानात जाऊ, पश्चिम बंगाल जाऊ, दिल्लीत जाऊ किंवा मणिपूरमध्ये जाऊ, असं वाटतंय की, इतकं प्रेम आणि सन्मान पाहून लोकंही हैराण झाले आहेत. मी दाव्यासह सांगू शकते की, इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर मलाच मिळत आहे.'

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून कंगना स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन ती करत आहे. या व्यतिरिक्त कंगना पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे, त्या चित्रपटामध्ये कंगना आर माधवनसोबत दिसणार आहे.

Kangana Ranaut News
Deepika Padukone Flaunt Baby Bump : दीपिका पदुकोणचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, अभिनेत्रीचा अनसीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com