Amol Kolhe: देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अमोल कोल्हे, अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरसह अनेक सेलिब्रिटींना बजावला अधिकार

Celebrity Who Voted For Election: देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागरिकांसोबतच अनेक कलाकारांनीदेखील मतदान केले आहे.
Celebrity Who Voted For Election
Celebrity Who Voted For ElectionSaam Tv

देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागरिकांसोबतच अनेक कलाकारांनीदेखील मतदान केले आहे. आज सकाळी अमोल कोल्हे सुबोध भावे, राहुल देशपांडे आणि अमोल कोल्हे यांनी मतदान केले आहे. त्याचसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून आणि ज्युनिअर एनटीआरने मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यात आज ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात शिरुर, छत्रपती संभाजी नगर, पुणे अशा अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. यासाठी शिरुर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला आहे.

राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. आज तेलंगणातील अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. त्यासाठी अल्लू अर्जून(Allu Arjun), ज्युनिअर एनटीआरने (Junior NTR) मतदान केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जूनने सांगितले की, 'कृपया तुम्हीही मतदान करा. भारतीय नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. पुढील पाच वर्षासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे'.

याचसोबत ज्युनिअर एनटीआरने देखील मतदान केले आहे. 'प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान करणे खूप महत्त्वाचे आहे, हा संदेश आपल्याला तरुण पिढीपर्यंत पोहचवाला हवा', असे ज्युनिअर एनटीआरने सांगितले.

Celebrity Who Voted For Election
Nashik Loksabha: हेमंत गोडसेंसाठी CM शिंदे मैदानात! मध्यरात्री मोठी खलबतं; मुख्यमंत्र्यांकडून नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदान सुरु आहे. राज्यात पुणे मतदारसंघात मतदारसंघात मतदान सुरु झाले आहे. यावेळी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave)आणि राहुल देशपांडे(Rahul Deshpande) यांनी मतदान केले आहे. यावेळी सुबोध भावेने सांगितले की, 'मतदान करणे हा आपला राष्ट्रीय अधिकार आहे. प्रत्येकानेच मतदान केले पाहिजेच'.

Celebrity Who Voted For Election
Maval EVM News : मावळमध्ये तळेगाव दाभाडेत EVM मशीनमध्ये बिघाड...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com