

भांडुप रेल्वे स्थानक परिसरात पालिका अधिकाऱ्याला मारहाण
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कार्यवाही करताना फेरीवाल्यांनी केली पालिका अधिकाऱ्याला मारहाण
फेरीवाल्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सध्या रमजानचा महिना सुरू असून रोजच मनमाड-नाशिक येथून पास बोगीतून पासधारक चाकरमानी कामानिमित्त मुंबईपर्यंत प्रवास करीत असतात. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने मुंबईहून परत येताना हिंदू-मुस्लिम ऐक्य साधत मुस्लिम बांधव सीएसटी येथून पंचवटी एक्सप्रेस सुटल्यानंतर गाडीत रमजान महिन्यातील उपवास सोडत पास बोगीत प्रत्येक पासधारकाला फ्रुट,मिठाईचे वाटप करत सर्वांसोबत संध्याकाळी गाडीतच उपवास सोडत असतात.यातून एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आणि भाईचारा वाढवा हाच उद्देश जोपासला जातोय. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाना सोबत घेत हा उपक्रम राबविला जात असून गाडीतील अनेक हिंदू प्रवासी यात मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात.
: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमएम व्हॅली येथे दोन गटात तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काल मध्य रात्री हाणामारीची ही घटना समोर आली, ज्यामध्ये एका तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे मात्र या गोंधळाचे कारण अद्याप पर्यंत कळू शकलेले नाही, परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, दोन गटांमधील ही हिंसक हाणामारी रस्त्याच्या मधोमध होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. उर्जानगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चक्क ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या. उर्जानगर येथील मेजर गेटजवळील 'राजश्री अपार्टमेंट'मध्ये काही लोक संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून फ्लॅट नंबर २०३ वर छापा टाकला.
श्रावण हर्डीकर हे होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सध्या प्रभारी आयुक्त
मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाला.
विज्ञानचा पेपर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने काॅफीमुक्त अभियानाची फज्जा उडाल्याची चर्चा
उमरखेड शिक्षण विभागाने जबाबदारी झटकली,कोणत्याही केंद्रावर असा प्रकार घडलेला नसल्याच बीओंचा म्हणणं
केंद्र संचालकांकडून माहिती मागविल्याची माहिती,नक्की विज्ञान भाग एकचा पेपर मोबाईल कोणत्या परिक्षा केंद्रावर व्हायरल झाला? पर्यवेक्षकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय का? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थितीत होत आहे.
- सिव्हिल हॉस्पिटल जवळील सात मजली इमारतीमधील तळमजल्यातील दुकानाला आग लागली होती.
- सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणाच्या माध्यमातून आग विझवण्यात आली आहे.
- सिविल हॉस्पिटलजवळील परिसरात धुर पाहायला मिळत आहे.
रायगडच्या पालक मंत्री पदाचा प्रश्न लवकर मार्गी लागणार नाही अशी चिन्ह आहेत. कारण रायगडच्या कर्जतमध्ये पालकमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर खा. सुनिल तटकरे यांनी पुन्हा एकदा निर्णयाबाबत वरिष्ठांकडे बोट दाखवल आहे. रायगड जिल्हा परिषदेतील संघर्षाबाबत झालेल्या महायुतीच्या बैठकीत पालक मंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याच खा. सुनिल तटकरे यांनी दिली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतली अस सांगत तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदाच्या प्रशाला बगल दिली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर
अविश्वास ठरावावर संसदेच्या सभागृहात दोन दिवस झाली चर्चा
आवाजी मतदानानं लोकसभाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर
विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी, कामकाज तहकूब
जालन्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे.जालना जिल्ह्यात तालुकास्तरावर तपासणी पथके स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना घरगुती गॅसच्या वितरणावर लक्ष ठेवून नियमित तपासणी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
काँग्रेसचे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे टोल विरोधात आक्रमक,टोल वसुली करू न देण्याचा दिला इशारा आहे.
पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. तरुणाची हत्या करतानाचा CCTV व्हायरल होत आहे. किरकोळ वादातून मारहाण आणि तरुणाची हत्या करण्यात आली असून ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरातील आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये बेकायदेशीर वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा विभाग आणि श्रीरामपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील दत्तभुवन हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये वापरासाठी ठेवलेले तब्बल 10 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
नवी मुंबई देखील व्यावसायिक गॅसची टंचाई सुरु आहे. नवी मुबंई मधील हॉटेलमध्ये आता गॅस ऐवजी आता चुलीवरती स्वयंपाक होत आहे. ज्यामुळे सगळं दहा मिनिटात व्हायचं मात्र आता अर्धा ते वीस तास जातोय चुलीवरचे जेवण बनवायला. त्यामुळे ग्राहकांकडून हवा तसा फीडबॅक मिळत नाही या युद्धामुळे आमचा मोठा नुकसान होत आहे.
आशिया खंडातील नंबर वन पंचतारांकीत औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहती वरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झाला असून 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत,त्यामुळे उद्योग व्यवसायातील साखळीच विस्कळीत झालीय,अचानक गॅसचा तुटवडा कसा झाला याबाबत साठेबाजी होण्याची भीतीही इंडस्ट्रियल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी बोलताना व्यक्त केली.
व्यवसायीक सिलेंडरच्या बंदीमुळे हॉटेल व्यवसाय बंद होणार असून याचा थेट फटका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गरीब कामगारांना बसणार आहे. शासनाने कोरोना काळात ज्या प्रमाणे अत्यावश्यक सेवा म्हणून हॉटेलला सिलेंडर दिले होते.
महापौर पद देऊन भाजपने शिवसेनेवर कोणतीही मेहरबानी केलेली नाही. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही आणि स्थायी समिती सभापती शिवसेनेचाच होणार, असा ठाम दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केला आहे.
नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धा मुळे भारताला त्याचा फटका बसत असला तरी पेट्रोल-डिझेल इंधन पुरवठ्यावर त्याचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही.
नांदेड शहराजवळील नांदेड नागपूर महामार्गावरील खडकूत पाटी जवळ घडली घटना.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत टिप्परला लागलेली आग आटोक्यात आणली.
आग लागलेल्या टिप्परचं मोठं नुकसान
नांदेडमध्येही आता गॅसचा तुटवडा भासू लागलाय. व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने नांदेड मधील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेत. मागील चार ते पाच दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद आहे. यामुळे नांदेडमध्ये हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
अमरावती बस डेपो–रेल्वे स्टेशन रोडवरील उस्मानिया मशीद जवळ ऑटोला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण
अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं.
गॅसवर चालणारा ऑटो असल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण
या घटनेत संपूर्ण ऑटो जळून खाक झाला असून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नेमकी आग कशाने लागली याचा पुढील तपास अमरावती सिटी कोतवाली पोलीस करत आहेत
जालन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्याने आज हॉटेल व्यवसायिकांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलीय.केंद्र शासनाच्या राजपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे.तर व्यावसायिक गॅसची काळया बाजारात विक्री होण्याची भीती देखील हॉटेल व्यवसायनी व्यक्त केली.दरम्यान व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प असल्याने हॉटेल व्यवसायिक चिंतेत असून उद्यापर्यंतच गॅस पुरेल इतका साठा शिल्लक असल्याची हॉटेल व्यवसायिकांचं म्हणणं आहे
युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता दिसू लागला आहे. भारतात गॅस धारकांना याचा फटका सहन करावा लागतोय. मुंबईमधील भांडुप विभागात असलेल्या भारत गॅस बाहेर गॅस धारकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. भर उन्हात गॅस घेण्यासाठी मोठी रांग लागली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग बंद केल्याने कुडाळमधील हॉटेल व्यावसायिक आणि छोटे उद्योजक संतप्त झाले आहेत. या प्रश्नावर आज व्यावसायिकांनी कुडाळचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. जर सिलिंडर मिळणार नसेल, तर पर्यटकांना जेवण कसे द्यायचे आणि कामगारांचे पगार कसे करायचे? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
खरेदी-विक्री संघाशी समन्वय साधून गॅसचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा. जोपर्यंत कमर्शियल सिलिंडर उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत हॉटेल व्यवसायासाठी घरगुती सिलिंडर वापरण्याची तात्पुरती मुभा द्यावी अशी मागणी व्यवसायीकांनी केली.
हैदराबादहून संभाजीनगरकडे पुठ्ठा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून तो ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना धारूर घाटात रविवारी मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रकला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने प्राण वाचले आहेत.
हैदराबादहून संभाजीनगरकडे पुढे घेऊन एमएच. १४, जे.४६९९ क्रमांकाचा ट्रक रविवारी मध्यरात्री धारूर घाटातील धोकादायक वळणावर पोहोचताच अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ३०० फूट खोल थेट दरीत कोसळला. ट्रक दरीत पडताच आग लागून मोठ्या प्रमाणात ज्वाळा उसळल्या. चालक महादेव बिक्कड यांनी ट्रकमधून उडी मारल्यामुळे त्याना किरकोळ दुखापत झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, हवामान विभागाने आता अधिकृतपणे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून, तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यंदाचा उन्हाळा कडक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. मात्र, मार्च महिन्याच्या केवळ दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याची वेळ आहे.
दुपारच्या वेळी तर उन्हाचा जोरदार तडाखा बसत असल्याने महिला, मुली डोक्याला असे स्कार्फ बांधून आपला बचाव करत आहे. ऊन पासून बचाव करण्यासाठी जळगावकर नागरिक आपले नित्यनियमाची कामे सकाळच्या सुमारास जळगावकर उरकून घेत आहे आगामी काळात देखील तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
गरीब आणि गरजू यांच्या आहारासाठी 2020 मध्ये शिवभोजन थाळी ही योजना सुरू करण्यात आली.मात्र आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका यवतमाळ मधील शिवभोजन केंद्राला बसणार आहे. शिव भोजन केंद्रातून हजारो सामान्य गरजू नागरिक दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण करतात मात्र या केंद्राकडे आता केवळ एक ते दोन दिवसाचा व्यावसायिक सिलेंडर शिल्लक असल्याने याचा फटका बसणार आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट जालन्यातील स्टील उद्योगाला बसतो आहे.मागच्या दहा दिवसांमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईमध्ये भाव प्रति टन 5 ते 6 हजार रुपयांची वाढले झाली आहे.इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असून गॅस टंचाईचा झळा देखील जालन्यातील स्टील उद्योगाला बसतोय. इराण इस्रायल युद्ध सुरू राहिल्यास लोखंडी सळईचे भाव आजुन वाढण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे.
- 660 मेगावॅट वीज प्रकल्पातील टर्बाइन मेंटेनन्स विभागातील हॉट एअर पाइपलाइन अचानक लीक झाली..
- संच क्रमांक 8 मध्ये सेफ्टी व्हॉल करताना झाला अपघात..
- गरम वाफ मोठ्या वेगाने बाहेर पडली. या वाफेच्यामुळे चार कर्मचारी भाजले.
- गरम वाफ लागल्यामुळे त्यांच्या हात-पायांची त्वचा किरकोळ भाजल्याची माहिती
- घटनेनंतर महाजेनको प्रशासनाने तत्काळ जखमी कर्मचाऱ्यांना कोराडी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले...
बीडच्या पाटोदा परिसरात दहावीची परीक्षा सुरू असतानाच आजच्या विज्ञान या विषयाच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनेकांकडे ही प्रश्नपत्रिका गेली असुन पेपर नेमका कोणी फोडला आणि कोठे फुटला याबाबतची माहिती मिळालेली नाही. एका परीक्षा केंद्रांवर अनेकांकडे या प्रश्नपत्रिकेसोबत संपूर्ण पेपरच्या उत्तराच्या झेरॉक्स असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात अनेक शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर देखील कॉपी प्रकरणात कारवाई झालेली आहे. यामुळे या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी होणार का ? आणि दोषींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
अमेरिका-इराण युध्दा मुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने त्याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसू लागला आहे,रेल्वेचे महत्वाचे जंक्शन शहर असलेल्या मनमाड मध्ये बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते,अनेक प्रवाशी जेवणासाठी तसेच लोजिंग मध्ये मुक्काम करत असतात मात्र सध्या कमर्शिअल गॅस टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकां कडे शिल्लक गैस वर काम भागवावे लागत असून येत्या दोन दिवसात शहरातील अनेक मोठे हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे हॉटेल व्यवसायिक सांगत आहे,हॉटेल बंद पडल्यास त्याचा फटका सर्वच घटकांवर बसणार असल्याचे हॉटेल च्या मालकांचे म्हणणे आहे
अमेरिका–इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा फटका आता घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर पडताना दिसत आहे. पनवेलमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
पनवेलमधील गॅस एजन्सीसमोर नागरिक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. अनेकांना पाच ते सहा तास रांगेत उभे राहूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी तर सिलेंडरचा साठा संपल्याचे सांगितले जात असून त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून ग्राहकांनी वितरकाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली आहे सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे नागरिकांना लवकर येऊन रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गॅस सिलेंडरची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ग्राहक सकाळी लवकर येऊनही तासन्तास प्रतीक्षा करत असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे...
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगाव शहरात यावेळी इंधनाचा तुटवडा भासत असून जळगाव शहरातील अनेक गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी गॅस बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे मात्र बुकिंग करूनही काही ग्राहकांना गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी यावेळी गॅस एजन्सी चालकांवर आपला रोष व्यक्त केला आहे जळगाव शहरातील एका गॅस एजन्सीवर आज नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या परिस्थितीचा आढावा घेतला आहे
सोलापूर -
गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अत्यंयात्रा काढत काँग्रेसकडून निषेध आंदोलन
सोलापूरातील काँग्रेस भवन कार्यालयापासून जिल्हापरिषद कार्यालयापर्यंत हे तिरडी आंदोलन केलं जाणार आहे
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन केलं जातंय
सोलापूर -
सोलापुरात काँग्रेसने काढली गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
सोलापुरातील काँग्रेस भवन परिसरातून सिलेंडरच्या अंत्ययात्रेला करण्यात आली आहे सुरुवात
देशभरात गॅस सिलेंडरचा तूटवडा आणि वाढलेल्या दरवाढीमुळे करण्यात येत आहे आंदोलन
राम नाम सत्य है, नरेंद्र झाले सरेंडरच्या घोषणा देत आंदोलना झाली सुरुवात
रायगड -
रायगड जिल्हा परिषदेत बसणार महायुतीची सत्ता
अध्यक्ष पद भाजपकडे तर उपाध्यक्ष पद शिवसेनेला मिळणार ?
राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्षानंतर वरिष्ठांनी काढला मार्ग
तालुका पातळीवर पंचायत समितींमध्ये देखील महायुतीच्या माध्यमातून पद वाटप होणार
जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील राखीव वनाला आग लावल्याचे प्रकरण
5 जणांना जुन्नर वनविभागाने भारतीय वन अधिनियमाच्या कलम खाली अटक केली आहे,
वन विभागाला आग लावल्यामुळे यामध्ये वन्य प्राणी व झाडे झुडपे जळाले
यामुळे वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक -
- अमेरिका इसराइल इराण युद्धाचा फळ पिकांना मोठा फटका
- गेल्यावर्षी पेक्षा द्राक्ष निर्यातीत 50% घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
- महाराष्ट्रातून सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातून होते फळ पिक आणि पालेभाज्यांची निर्यात
- आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा द्राक्षांना बसला फटका
- निर्यात होणारे द्राक्ष काही प्रमाणात अडकून पडल्याने मोठे नुकसान
- मागील वर्षी नाशिकमधून 1 लाख 31 हजार मेट्रिक टन द्राक्षांची झाली होती निर्यात
- आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे यंदा 65 ते 70 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात
ठाणे -
ठाण्यातील एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर तोडगा निघाला नाही तर ठाण्यातील ७० टक्के हॉटेल आणि लग्न कार्यकांचे हॉल येत्या रविवारपर्यंत बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
अमेरिका इस्राईल इराण युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम...
नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...
अनेक पंपावर LPG दर वाढल्याचा सूचना..
LPG तुटवड्यामुळे पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा
LPG गॅस 74.95 प्रति लिटर
मात्र LPG गॅस चा तुटवडा असल्याने रात्रीपासूनच पंपावर रिक्षांची गर्दी
युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्राहकांनी समजून घेण्याचे LPG चालकांकडून फलकांवर आवाहन
पुणे शहरात नोकरीसाठी शिकण्यासाठी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मेस सुरू असतात.मेसला लागणारा गॅस कमर्शियल बंद केल्यामुळे आता चालवणारे चुलीवर स्वयंपाक करत आहेत..पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या स्वामिनी गर्ल्स हॉस्टेल यांचे मेस सध्या चुलीवर बनवण्यात येत आहे... या मेस वर जवळपास दोनशेहून अधिक मुलीचे जेवण बनवले जातात.
LPG गॅस व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध
अत्यावश्यक सेवेत गॅस लागणाऱ्यांना आता द्यावा लागणार एक अर्ज
हॉस्पिटल, वसतिगृह, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या संस्था, वेदपाठ शाळा, शिक्षण संस्था, संरक्षण क्षेत्राचा समावेश
या सर्वांना त्यांच्या संस्थेच्या लेटरहेड वरती अर्ज केल्यावर ती मिळणार व्यवसायिक सिलेंडर
अर्जामध्ये व्यवसायिक सिलेंडर किती लागतात याचे गणित मांडण्याची आवश्यकता
त्यानुसार गॅस एजन्सी ना निम्मे सिलेंडर देण्याची मुभा
पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाकडून पुन्हा कारवाईला सुरुवात.... अतिक्रण काढण्यास पाटबंधारे विभागाने केली सुरवात..
जानेवारी महिन्यात पाटबंधारे विभागाच्या झालेल्या कार्यशाळेत कृष्णा खोरे मंडळाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या..सदर कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई आणि विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते..
या पार्श्वभूमीवर खडकवासला जलसंपदा विभागाने पुणे महापालिका , हवेली पोलिसांच्या सहकार्याने..खानापूर , गोऱ्हे खुर्द येथील सात ठिकाणची अनधिकृत बांधकामे हटवली आहेत..
या कारवाईसाठी पुणे महापालिकेने ४ जेसीबी , १ धडक कारवाई पिंजरा बस, १ डंपर , ५ मजूर तर हवेली पोलिसांच्या वतीने १० पोलीस कर्मचारी कारवाईस्थळी तैनात करण्यात आले होते..
या कारवाईत प्रामुख्याने धरणतिरालगत असलेली तार कंपाऊंड, पत्रा शेड हटवण्यात आली....खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शाखाअभियंता गिरीजा फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली..
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू येथील संत तुकाराम महाराजांचे राहत्या घराचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा विकास आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. या प्रकल्पामुळे देहूकरांसह वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेत संत तुकाराम महाराजांच्या वास्तूचे जतन, परिसराचा विकास तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे देहू हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अधिक आकर्षक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
विश्वस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, वारकरी संप्रदायासाठी ही महत्त्वाची पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे...
बुलढाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींसह महिला व सज्ञान मुली बेपत्ता होण्याचा प्रमाण लक्षणीय वाढलं असून गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सहा मुलींसह एक विवाहिता बेपत्ता झाली आहे. तर एक जानेवारी ते 10 मार्च पर्यंत जिल्ह्यातील 289 जण बेपत्ता झाले आहेत त्यात 200 च्या वर महिला आहेत. बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचं प्रमाण वाढलं असल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेच व दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचे किंवा महिलांचे नंतर काय होतं याबाबत कुठलीही माहिती समोर येत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. याबाबत मात्र पोलीस बोलण्यास तयार नाहीत
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद
गॅसचा अवैद्य साठा करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार
*हॉटेल आणि इतर उद्योगांना लागणारा गॅस पुरवठा करण्यात आला तात्पुरता बंद
घरगुती गॅस सोबत हॉस्पिटल्स, निवासी शाळा, शैक्षणिक संस्थांना लागणारा गॅस पुरवठा मात्र सुरळीत
हॉटेल्स चालकांनी गॅसचे नियोजन करून जपून वापरावा
गॅस तुटवड्याची परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांची माहिती
युद्धजन्य परिस्थिती मुळे व्यवसायिक सिलेंडरवर परिणाम
आजपासून गॅस एजन्सीच्या माध्यमातून व्यावसायिक गॅस सिलिंडरचं ९५ टक्के वितरण बंद
रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक गॅसवर
फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवा असेलल्या ठिकाणी मिळणार व्यावसायिक सिलिंडर
कंपन्यांकडून गॅस एजन्सीला व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरण न करण्याच्या सूचना
गॅस एजन्सीचा व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठाही जवळपास बंद
व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक हॅाटेल, छोटे रेस्टॅारंट, मेस, कॅटरिंग सेवेवर परिणाम
काही व्यावसायिकांकडे शेवटचा एकच सिलेंडर
गॅस मिळत नसल्याने हॉटेल बंद करण्याची येऊ शकते वेळ
मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष कोमल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकरी व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सहभागी झाले होते. भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा,जनावरांच्या छावण्यांची प्रलंबित बिले द्यावीत, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, शेतीमालाला हमी द्यावा यासह इतर मागण्यांसाठी संत दामाजी चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिनी बंद,तीन गॅस दहिन्या बंद
पुणे महापालिका आयुक्तांनी आदेश काढले आहेत.
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची उपलब्धता कमी आहे
पुणे शहरात एकूण २७ विद्युत वाहिनी असून एलपीजी वर १८ सिस्टम आहे तर विद्युतवर १० आहे आणि एपिसी ३४ आहे अस एकूण ५२ दाहिन्या आहे.ज्यात दररोज ११२ फायर होत असतात.
सध्या युद्धामुळे जी काही परिस्थिती तयार झाली आहे ती आपल्या समोर आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी जे काही धोरण केंद्राने आणलं आहे ते पाहता एलपीजी चालणारे विद्युत वाहिनी ही व्यावसायिक वापरामध्ये येत असल्याने जे एलपीजीवर १८ सिस्टम आहे ते बंद असणार आहे.
नागरिकांनी काळजी करू नये तसेच कोणीच पॅनिक होऊ नये जे विद्युत दाहिनी तसेच एपिसी आहे त्याचा वापर हा वाढवण्यात येणार आहे.
मिरजेचे भाजपा आमदार सुरेश खाडे व सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.. ज्याला मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आणि या इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला आहे.. भाजपाचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारूख जमादार व भाजपा नगरसेविका बानू जमादार यांच्यावतीने या इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं.
धाराशिव जिल्ह्यात शासकीय वाहन, जीवनावश्यक सेवा यांच्यासाठी पेट्रोल डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश
युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोलपंप चालकांना प्रतिबंधात्मक आदेश
तसेच पेट्रोल पंपावर कॅन मध्ये सुटे पेट्रोल, डिझेल देण्यास बंदी; सुट्टे पेट्रोल डिझेल देणाऱ्यांवर कारवाई होणार
युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या अफवांमुळे साठेबाजी रोखण्यासाठी निर्णय
शेतीकामासाठी कॅनमध्ये सुट्टे डिझेल घेऊन जाणारे ट्रॅक्टर धारकांना निर्णयाचा फटका बसणार
ट्रॅक्टरच्या इंधनाच्या टाकीतच डिझेल दिले जाणार, पुरवठा विभागाने केल स्पष्ट
शेती मशागतीच्या कामांना ब्रेक , ट्रॅक्टर घेऊनच पेट्रोल पंपावर जावं लागणार
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे अवैध देशी दारू विरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. आंदेगाव येथे अनेक वर्षापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. या अवैध देशी दारू मुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.परिणामी लहान वयात त मुलांना या देशी दारूचे व्यसन लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने गावकरी त्रस्त झाले होते.अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांसमोरच अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकली. पोलिसांना अवैध देशी दारू विकत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. गावातील अवैध देशी दारू तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते.
नागपूरसह विदर्भात उन्हाचे तीव्र चटके बसत असतानाच पुन्हा एकदा विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट
विदर्भात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून 14 आणि 15 मार्चला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
नागपूर वेधशाळेने व्यक्त केला अंदाज....
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो उत्तरेकडे सरकण्याची शक्यता त्याचा थोडाफार प्रभाव विदर्भ आणि मध्य भारतावर पडून विज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे...
सध्या नागरिक ऊन आणि उकाडापासून त्रस्त असून या पासून काही अंशी आठवड्याच्या अखेरीस दिलासा मिळण्याची शक्यता
नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, LPG चा पुरेसासाठा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी वृत्तपत्र मध्ये जाहिरात देऊन केला खुलासा
पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीचा पुरेसासाठा उपलब्ध असून नियमित आणि सुरळीत पुरवठा करण्यात येण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचा आश्वासन
दर महिन्याला मिळणाऱ्या सिलेंडरची मर्यादा पंधरा दिवसांवरून 25 दिवसांवर करण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
नागरिकांनी अनावश्यक पंपावर गर्दी टाळावी अफांवर विश्वास न ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचा आवाहन....
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राञी दहा च्या दरम्यान हा प्रकार घडला असून या घटनेत दहा हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटांतील तरुण आमने सामने येत एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कळंब शहरातील भर चौकात दोन राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यात जोरदार राडा पहिला मिळाला होता त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने पोलीस नेमकं काय करतात?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्यांची सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. रायगडमध्ये पंचायत समितीच्या 118 सदस्य पदांच्या जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये सर्वाधिक 37 जागा शिंदे शिवसेनेला मिळाल्या आहेत तर भाजप 34 आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीने 31 जागांवर विजय मिळवला आहे. निवडून आलेले हे पंचायत समिती सदस्य आज निवडणुक प्रक्रियेने सभापतीची निवड करणार आहेत. जिल्ह्यातील राजकिय परिस्थितीनुसार शिंदे सेना 6 ठिकाणी, राष्ट्रवादी 5 ठिकाणी तर भाजपला 3 ठिकाणी सभापती पद मिळण्याची शक्यता आहे.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्याबरोबरच याचा अवैध्य वापर रोखण्यासाठी दक्षता घेण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.