CM Devendra Fadnavis
विधानसभा निवडणूक निकालानंतर 11 दिवसांनी अखेर महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यात महायुतीकडून भाजपने मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घातली आहे. फडणवीस हे यावेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. 2014मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा भाजपचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर 2019मध्ये पक्ष फुटीच्या राजकरणामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रिपदावर जावं लागलं. त्यानंतर यावेळी 2024मध्ये ते उद्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या सोहळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आत्तापर्यंतचे राज्याचे तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नागपूरचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान देखील फडणवीस यांना मिळाला होता.