मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार, भुजबळांचा VSR विमानानं मुंबई-नाशिक प्रवास, बघा VIDEO

Devendra Fadnavis VSR Aircraft Mumbai To Nashik Travel News: अजित पवार यांच्या अपघातानंतर चर्चेत असलेल्या VSR कंपनीच्या विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांनी मुंबई ते नाशिक प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संबंधित विमान कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तसेच या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी विरोधकांकडून होत आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानांचा शिंदेसेनेच्या नेत्यांनीही धसका घेतला आहे. या विमानांतून प्रवास न करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या नेत्यानं घेतल्याचे सांगितले जात आहे. या VSR विमान कंपनीच्या सेवेवर शंका उपस्थित केली जात आहे. पण दुसरीकडे, सत्ताधारी पक्षांतील प्रमुख नेते अजूनही याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी याच व्हीएसआर कंपनीच्या विमानाने मुंबई ते नाशिक प्रवास केला.

नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली. मुंबईवरून ते थेट विमानाने नाशिकला दाखल झाले. मात्र ज्या विमानाने त्यांनी प्रवास केला ते VSR कंपनीचे असल्याने चर्चांना उधाण आले. सरकारने VSR कंपनीला क्लीन चीट दिली का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे. फडणवीस यांच्यासोबत सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये आल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com