अजितदादांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं? सरकार संशयाची भुतं नाचवतंय

Raj Thackeray statement: रोहित पवारांपाठोपाठ आता राज ठाकरेंनाही अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी संशय आहे... त्याबाबत राज ठाकरेंनी भूमिका मांडलीय.. मात्र राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Raj Thackeray raises serious questions over Ajit Pawar’s death, demanding transparency and FIR in the aircraft accident case.
Raj Thackeray raises serious questions over Ajit Pawar’s death, demanding transparency and FIR in the aircraft accident case.Saam Tv
Published On

अजित पवारांच्या मृत्यूनंतर संशयाचं धुकं आणखी गडद होत चाललंय... आणि त्याला कारण ठरलंय ते दादांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांचा आधी मरीन लाईन्स आणि त्यानंतर बारामती पोलिसांनी न घेतलेला एफआयआर.... यानंतर रोहित पवारांनी थेट शिवतीर्थ गाठून राज ठाकरेंची भेट घेत दादांच्या मृत्यूप्रकरणी न्यायासाठी साथ देण्याची विनंती केली...आणि राज ठाकरेंनीही या प्रकरणात उडी घेत संशय व्यक्त केलाय... तर सुनेत्रा पवारांनीही याबाबत बोलायला हवं, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिलाय..

खरं तर अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला.. व्हीएसआर कंपनीच्या लिएरजेट 40 आणि 45 या विमानांच्या चारही मॉडेलच्या देखभाल आणि तांत्रिक बाबींमध्ये त्रुटी आढळल्या...त्यामुळे व्हीएसआर कंपनीला जबाबदार धरुन त्यांची उड्डाणं रद्द कऱण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कंपनीवर एफआयआर दाखल केली जात नाही.... त्यामुळे या प्रकरणात आता राज ठाकरेंनी उडी घेतल्यानं सरकारवर आणखी दबाव वाढलाय.. त्यामुळे एफआयआर दाखल करण्याचा नागरिकांचा अधिकार सरकार मान्य करणार का? आणि संशयाचं धुकं आणखी गडद होण्याआधीच व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com