भाजपच्या नेत्याला जामीन, निवडणुकांआधी गोळीबाराच्या घटनेनं उडाली होती खळबळ

Court Grants Bail To Ex-BJP Corporator: नाशिकमधील गाजलेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना तब्बल सहा महिन्यांनंतर न्यायालयाकडून अटींसह जामीन मंजूर करण्यात आला असून या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
Former BJP corporator Jagdish Patil granted bail by court in connection with the Nashik firing case
Former BJP corporator Jagdish Patil granted bail by court in connection with the Nashik firing caseSaam Tv
Published On

नाशिकमध्ये गाजलेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटीलला अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. फुलेनगर परिसरातील सागर जाधव या तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी जगदीश पाटीलला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जगदीश पाटील याच्यासह तब्बल 11 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या गुन्ह्यात जगदीश पाटील यांचा सहभाग आढळून आल्याने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. अटकेनंतर गेल्या पाच महिन्यांपासून जगदीश पाटील न्यायालयीन कोठडीत होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने अटींसह त्याला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.

Former BJP corporator Jagdish Patil granted bail by court in connection with the Nashik firing case
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्याकडं सर्वात मोठी जबाबदारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड

नेमके प्रकरण काय?

पंचवटी पेठरोडवरील राहुलवाडी येथे काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर दोन तडीपार गुंडांनी दोन गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात भाजपचा माजी गटनेता तथा नगरसेवक जगदीश पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या होत्या. पंचवटीमध्ये 2017 ला किरण निकम याचा खून करण्यात आला होता. या निकम टोळीतील तडीपार गुंड संशयित विकी उत्तम वाघ आणि विकास उर्फ विकी विनोद वाघ या दोघांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीने येत जाधववर गोळ्या झाडल्या होत्या.

Former BJP corporator Jagdish Patil granted bail by court in connection with the Nashik firing case
Farm Land: आता जमिनीवरून नाही होणार वादावादी; सामाईक शेतजमिनी होणार शेतकऱ्यांच्या नावावर

या गोळीबाराच्या कटात जगदीश पाटीलचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने पुरावे तपासामधून पोलिसांच्या हाती लागले होते. या पुराव्यांवरून सहभाग निष्पन्न झाल्यामुळे जगदीश पाटीलची पोलिसांनी उचलबांगडी केली होती. चौकशी दरम्यान भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटीलने त्या आरोपींसोबत वेळोवेळी मोबाइलवरून संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच गोळीबाराच्या घटनेअगोदर पाटीलने घटनास्थळावर भेट दिल्याचेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते.

Former BJP corporator Jagdish Patil granted bail by court in connection with the Nashik firing case
वाल्मीक कराडच्या जामीनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

यानंतर त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. अखेर आज 6 महिन्यांनी त्याला जमीन मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून जामीन मिळाल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com