वाल्मीक कराडच्या जामीनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Major Setback For Walmik Karad As Supreme Court Denies Bail: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असल्याचा मोठा दावा समोर आला आहे.
Supreme Court denies bail to main accused Valmik Karad in the Santosh Deshmukh murder case, extending his jail stay
Supreme Court denies bail to main accused Valmik Karad in the Santosh Deshmukh murder case, extending his jail staySaam Tv
Published On

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. यामुळे कराडचा जेलमधील मुक्काम वाढला असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील मोठा दणका दिला आहे. अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. सुरुवातीला कुठलाही तपास केला जात नव्हता. मात्र मोर्चे आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

Supreme Court denies bail to main accused Valmik Karad in the Santosh Deshmukh murder case, extending his jail stay
Kalyan Crime : बहिणीला शाळेत सोडायला गेला, घरी परतताना वाटेत भावासोबत भयंकर घडलं

मोठा दाबाव टाकल्यानंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली होती. या हत्येचा मुख्य आरोपी धनंजय मुंडे यांचा कट्टर कार्यकर्ता आणि परळी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष वाल्मीक कराड हा मात्र राजकीय छत्रेत पोलिसांना गुंगारा देत होता. काही दिवसांनी तो स्वतः सरेंडर झाला. यानंतर ही केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना दिल्यानंतर कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का लावण्यात आला.

Supreme Court denies bail to main accused Valmik Karad in the Santosh Deshmukh murder case, extending his jail stay
Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा

सुप्रीम कोर्टाचा दणका

वाल्मीक कराडने यापूर्वी ही जिल्हा न्यायालय आणि पुढे मुंबई उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र गुन्हा इतका गंभीर असल्याने आणि पुराव्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाला वाल्मीक कराडने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. पण त्याला तिथेही दणका दिला आहे. त्यामुळे वाल्मीकला मोठा झटका बसला असून त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

Supreme Court denies bail to main accused Valmik Karad in the Santosh Deshmukh murder case, extending his jail stay
Ajit Pawar plane crash : अजित पवारांनी ज्या विमानातून अखेरचा प्रवास केला, त्या कंपनीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

कृष्णा आंधळे जिवंत, तीनदा गावात

तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असलेला कृष्णा आंधळे हा जिवंत असून तो त्याच्या गावी तीनवेळा येऊन गेल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी दिली. कृष्णा आंधळे हा तीनवेळा गावात येऊन गेल्याचा मोठा दावा त्यांनी केला. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन काढणे अवघड जात असल्याचे म्हटले जाते. यामुळे त्याला कोणी वाचवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com