Kalyan Crime : बहिणीला शाळेत सोडायला गेला, घरी परतताना वाटेत भावासोबत भयंकर घडलं

Kalyan West Bail Bazar : कल्याणच्या बैलबाजार परिसरात किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Kalyan Crime : बहिणीला शाळेत सोडायला गेला, घरी परतताना वाटेत भावासोबत भयंकर घडलं
Kalyan West Bail Bazar CrimeSaam Tv
Published On
Summary
  • विद्यार्थ्याची दुचाकी अडवून दोन तरुणांनी हल्ला केला

  • मारहाणीसह चाकूने वार केल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

  • परिसरात आरोपींची दहशत असल्याची नागरिकांची तक्रार

  • पोलिस तपास सुरू; गस्त वाढवण्याची स्थानिकांची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण शहरातील बैलबाजार परिसरात फरदीन शेख या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ आम्हाला काय बघतोस? असा जाब विचारत दोन तरुणांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात राहणारा फरदीन शेख हा विद्यार्थी त्याच्या लहान बहिणींना शाळेत सोडून घरी परत येत असताना दोन तरुणांनी त्याची दुचाकी अडवली .'तू आमच्याकडे का बघत होता' असं विचारत या तरुणांनी फरदीनला मारहाण केली. तसेच चाकूने फरदीनवर प्राण घातक हल्ला केला.

Kalyan Crime : बहिणीला शाळेत सोडायला गेला, घरी परतताना वाटेत भावासोबत भयंकर घडलं
Shocking : कोल्हापूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २५ वर्षाच्या तरूणाला अटक

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणांची परिसरात दहशत असून ते वारंवार नागरिकांना त्रास देत असतात. यापूर्वीही किरकोळ कारणांवरून वाद घालण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Kalyan Crime : बहिणीला शाळेत सोडायला गेला, घरी परतताना वाटेत भावासोबत भयंकर घडलं
Mumbai Police Recruitment : मुंबईमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार, धावण्याच्या स्पर्धेत केली अदलाबदल, चौघांविरोधात गुन्हा

आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे बैलबाजार परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com