Mumbai Police Recruitment : मुंबईमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार, धावण्याच्या स्पर्धेत केली अदलाबदल, चौघांविरोधात गुन्हा

Mumbai Police Recruitment Running Test Scam : मुंबई पोलीस भरतीच्या धावण्याच्या चाचणीत चिप अदलाबदल व शॉर्टकट घेतल्याचा गैरप्रकार उघड झाला असून पवई पोलिसांनी चार उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
Mumbai Police Recruitment Running Test Scam
Mumbai Police Recruitment Running Test ScamSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई पोलीस भरती धावण्यात चिप अदलाबदल प्रकरण उघड

  • १०० व १६०० मीटर चाचणीत शॉर्टकट व वेळेत फेरफार

  • चार उमेदवारांविरोधात पवई पोलिसांकडून गुन्हा दाखल

  • तपास सुरू

संजय गडदे,मुंबई

मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी मैदानात सुरू असलेल्या धावण्याच्या चाचणीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. चिपची अदलाबदल करून तसेच वेळेत फेरफार केल्याचा प्रकार समोर आल्याने पवई पोलिसांनी चार उमेदवारांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात १०० व १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. धावण्यादरम्यान एका उमेदवाराच्या पायात दिलेली चिप निघाल्याने तो खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गुणपत्रिकेत तफावत आढळल्याने एका महिला पोलीस शिपायाने चौकशी केली असता संबंधित उमेदवाराने चिपची अदलाबदल केल्याची कबुली दिली.

Mumbai Police Recruitment Running Test Scam
Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

चौकशीत उघड झाले की, एका उमेदवाराला १०० मीटर धावण्यात १५ पैकी १० गुण मिळवून देण्यासाठी चिप बदलण्यात आली होती. तसेच आणखी दोन उमेदवारांनी १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत ४०० मीटरऐवजी ३ राऊंड पूर्ण करून शॉर्टकट घेतल्याचा प्रकार समोर आला.

Mumbai Police Recruitment Running Test Scam
Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

चिप स्कॅन करून वेळेत फेरफार केल्याचेही निष्पन्न झाले. घडलेला प्रकार लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी पवई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चारही उमेदवारांविरोधात फसवणूक व गैरप्रकाराचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com