

महापौर निवडूनही केडीएमसी महासभा अद्याप आयोजित नाही
बजेट चर्चेला विलंब झाल्याने विकासकामांवर परिणाम होण्याची भीती
विरोधकांचा प्रशासनावर दबाव व आंदोलनाचा इशारा
स्थायी समिती व सदस्य नियुक्त्यांबाबतही स्पष्टीकरणाची मागणी
संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली
Kalyan Dombivli Municipal General Body Meeting Delay कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका होऊन महापौर देखील ठरला, तरीही अद्याप नवनिर्वाचित नगरसेवकांची महासभा अद्यापही झालेली नाही. ही सभा २० फेब्रुवारीपर्यंत घेणे अपेक्षित होते, मात्र महायुतीला स्पष्ट बहुमत त्यानंतर बिनविरोध महापौर उपमहापौर निवड झाल्यानंतर ही अद्यापही महासभेची तारीख स्पष्ट न झाल्याने आता शिवसेना उभा ठाणे आक्रमक पवित्रा घेतला आहे.
इतर महापालिकांमध्ये महासभेचे आयोजन करून बजेटवर सखोल चर्चा करत शहराचा विकास कामांना चालना देण्यात आली, मात्र कल्याण डोंबिवलीत अद्यापही महासभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. महासभेचे आयोजन करून पुढील वर्षाच्या बजेटवर चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही महासभेचे आयोजन केलं नाही त्यामुळे बजेटवर चर्चा न झाल्याने याचा परिणाम पुढील वर्षाच्या विकास कामांवर होऊ शकतो. असा आरोप उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला आहे.
कोणाच्या दबावामुळे महापौर महासभा घेण्यास विलंब होतो आहे? असा सवाल देखील बोरगावकरांनी उपस्थित केला आहे . महासभेचे आयोजन कधी याचा २८ तारखेपर्यंत खुलासा द्या ,अन्यथा केडीएमसी मुख्यालयावर ढोल ताशांच्या गजरात जनजागर लोकशाहीचा जनआदोलन करण्यात येईल. असा इशारा उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी महापौर उपमहापौर आयुक्तांना दिला आहे.
कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या ११९ सदस्य संख्येप्रमाणे बलाबलानुसार स्थायी समिती सदस्य तसेच स्वीकृत सदस्य नियुक्त करणार का? याबाबत स्पष्टीकरण देण्याचे मागणी देखील बोरगावकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.