Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला; ६०० कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश

Sharad Pawar NCP Maharashtra Political News : हिंगोलीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र अतिश दांडेगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वडील राष्ट्रवादीत कायम असताना कुटुंबात राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत.
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला; ६०० कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश
Sharad Pawar NCP Maharashtra Political NewsSaam Tv
Published On
Summary
  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का

  • अतिश दांडेगावकर यांचा ६०० कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

  • दांडेगावकर कुटुंबात राजकीय मतभेद निर्माण

  • स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू

Maharashtra Hingoli Sharad Pawar Atish Dandegavkar Join BJP News राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष व शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या, माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरांचे सुपुत्र भाजपच्या गळाला लागले आहेत.

हिंगोलीत राज्याचे माजी सहकारराज्यमंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष राहिलेल्या जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ६०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील अतिश दांडेगावकर यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला; ६०० कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

दरम्यान गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दांडेगावकर यांचे कुटुंब एकनिष्ठ होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पद देखील जयप्रकाश दांडेगावकर यांनी भूषवले आहे. मात्र आता त्यांच्याच कुटुंबात मुलगा भाजपमध्ये तर वडील राष्ट्रवादीमध्ये असा प्रसंग निर्माण झाला आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला; ६०० कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

मात्र आपण विकासाच्या मुद्द्यावरती भाजप मध्ये पक्षप्रवेश करतोय असं भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यावर अतिश दांडेगावकर म्हणाले आहेत. तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे, मात्र अजूनही शरद पवारांसोबत एकनिष्ठ असल्याचं पाहायला मिळाल आहे. दरम्यान दांडेगावकर यांच्या मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मिळाला आहे. आता हिंगोलीत राजकारणाला कोणतं नवं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com