Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा

Nagpur Crime News : नागपूरच्या यशोधानगर परिसरात भाच्याकडून मामीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा
Nagpur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरच्या यशोधानगर परिसरात विनयभंगाची घटना

  • नात्यातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद, आरोपी अटकेत

  • पीडित महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पराग ढोबळे, नागपूर

नागपुरातील यशोधानगर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाने त्याच्या सख्ख्या मामीचा विनयभंग केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने पिडीतेसोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला यशोधरा नगर भागात आपल्या पती व कुटुंबासह राहते. आरोपी हा तिचा नात्याने भाचा असून काही दिवसांपासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता. पहिल्यांदा १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महिला आपल्या बेडरूममधील कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी आरोपी बेडवर झोपल्याचे भासवत होता. महिला कपडे घेऊन बाहेर पडत असताना आरोपीने अचानक तिच्या मागून पकडण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला घाबरली व तिने आरोपीला जाब विचारला. मात्र आरोपीने कोणतेही उत्तर न देता घटनास्थळावरुन पळ काढला.

Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा
AI Summit Protest : २० पोलिसांना मध्यरात्री बेड्या, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल, २ राज्यातील बडे अधिकारी का भिडले?

त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य घरात नसल्याने महिला घाबरली होती. तरीही नातेसंबंधांमुळे तिने तो प्रसंग दुर्लक्षित केल्याचे सांगितले जाते. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा महिला घरात एकटी असताना समोरच्या खोलीचा दरवाजा लावत होती. त्याच वेळी बेडरूममध्ये दबा धरून बसलेल्या आरोपीने पुन्हा तिच्या पाठीमागून येत महिलेला बेडवर ढकलून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे महिला घाबरली, मात्र तिने धैर्य दाखवत आरोपीला जोरात धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेनंतर ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.

Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा
Mumbai Police Recruitment : मुंबईमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार, धावण्याच्या स्पर्धेत केली अदलाबदल, चौघांविरोधात गुन्हा

सततच्या छळाला कंटाळून अखेर महिलेने यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या विनयभंगासंदर्भातील विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com