Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर कोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली

Mumbai Police: मोबाइल पाहण्यावरून नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या नवऱ्याने बायको आणि मुलावर कोयत्याने सपासप वार केले. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर कोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली
Mumbai Crime Saam tv
Published On

Summary -

  • मोबाईल पाहण्यावरून नवरा-बायकोत कडाक्याचे भांडण

  • संतापलेल्या नवऱ्याे कोयत्याने बायको आणि मुलावर वार केले

  • हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये मोबाइल पाहण्यावरून झालेल्या वादात नवऱ्याने बायको आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. बायकोवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. तर मुलाला मारहाण करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ते पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंधेरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पती संतोष फकीर रावतेला (४४ वर्षे) अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निता रावते (४८ वर्षे) या आपल्या दोन मुलांसह आणि पती संतोष रावते यांच्यासोबत कनाकिया सहयोग एसआरए सोसायटीमध्ये राहतात. निता नोकरी करत असून संतोष कोणतेही काम करत नसल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते.

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर कोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली
Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

रविवारी रात्री निता घरामध्ये मोबाइल पाहत बसल्या होत्या. त्यावेळी संतोषने मोबाइल पाहण्यावरून वाद घातला. वाद वाढत जाऊन शाब्दिक बाचाबाचीतून संतापलेल्या संतोषने कोयत्याने निता यांच्यावर आणि सात वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात निताच्या दोन्ही हातांना, करंगळीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर मुलाच्या डाव्या हाताला लागले आहे.

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर कोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली
Crime News: आधी गोळी झाडली, नंतर तुकडे करत निळ्या ड्रममध्ये भरला मृतदेह; पोरानं बापाला क्रूरपणे संपवलं

हल्ला होत असताना निता जोरजोरात ओरडत होत्या. त्यांचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावून आले. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. जखमी निताला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर कोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली
Dombivli Crime : १० बिअर, ४५ झोपेच्या गोळ्या; डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, नर्स ठरली कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com