Crime News: आधी गोळी झाडली, नंतर तुकडे करत निळ्या ड्रममध्ये भरला मृतदेह; पोरानं बापाला क्रूरपणे संपवलं

UP Crime : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक भयानक घटना घडली आहे, आशियाना पोलिस स्टेशन परिसरातील सेक्टर एल येथील एका घराच्या आत ड्रममध्ये मृतदेह आढळला आहे.
UP Crime :
Police investigating outside the Ashiyana Sector-L residence in Lucknow where Path Lab owner Manavendra Singh’s body was recovered from a blue drum.saam tv
Published On
Summary
  • मानवेंद्र सिंह 20 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते.

  • आशियाना सेक्टर-L येथील घरात निळ्या ड्रममध्ये मृतदेह आढळला.

  • डोक्यावर व पायावर जखमांचे निशाण आढळल्याने हत्येची शक्यता.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भयानक घटना घडली आहे. एका पॅथॉलॉजी लॅब मालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. लखनऊच्या आशियाना पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर एल येथे एका घराच्या आत ड्रममध्ये एक मृतदेह आढळला. त्यावेळी लखनऊच्या आशियाना परिसरात एकच खळबळ उडाली.

येथील शेजाऱ्यांना जेव्हा दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना पोलिसांना याची महिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि ड्रममधून मृतदेहांचे तुकडे जप्त केले. पोलिसांनी मृत तरुणाच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जातेय. मृताचे नाव मानवेंद्र सिंग असे आहे, तो पॅथॉलॉजीचा मालक होता आणि सेक्टर एल येथील रहिवासी होता.

मृत मानवेंद्र सिंग यांचे अनेक जिल्ह्यांमध्ये पॅथॉलॉजी सेंटर आणि दारूची दुकाने होती. पोलिसांनी त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मृतदेहाचे इतर तुकडे शोधण्यासाठी पोलीस काम करत आहेत.

मुलाने वडिलांची हत्या कशी केली

पॅथॉलॉजी ऑपरेटरच्या हत्येबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने प्रथम त्याच्यावर गोळी झाडली आणि नंतर मृतदेहाचे तुकडे केले. गुन्हा केल्यानंतर, मुलाने लोकांना वडिलांनी आत्महत्या केली आहे असे सांगत त्यांची दिशाभूल केली. त्याने मृताच्या ब्रेझा कारमधून नेत मृतदेहाचे तुकडे फेकून दिले. दरम्यान पोलिसांना घरातून मृतदेहाचे धड सापडले. असे म्हटले जात आहे की मानवेंद्र सिंगने त्यांच्या मुलाला NEET ची तयारी करण्यासाठी दबाव आणला होता.

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

मानवेंद्र सिंग त्यांचा मुलगा अक्षत प्रताप सिंग उर्फ ​​राजा आणि त्यांच्या मुलीसोबत राहत होते. मानवेंद्र यांच्या पत्नीचे सुमारे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले. मानवेंद्र यांचा मुलगा राजा यांनी २३ फेब्रुवारी रोजी आशियाना पोलिस ठाण्यात मानवेंद्र बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. आशियाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी संध्याकाळी, मानवेंद्रच्या शेजाऱ्यांनी दुर्गंधी येताच पोलिसांना कळवले. पोलिसांनी येऊन घराची झडती घेतली तेव्हा त्यांना मानवेंद्रचा अर्धा मृतदेह एका मजल्यावर आणि दुसरा अर्धा दुसऱ्या मजल्यावर आढळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com