Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

newly married woman shot in Punjab: नवविवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली. ही घटना पंजाबमधील आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
newly married woman shot in PunjabSaam Tv
Published On

Summary -

  • पंजाबच्या तरनतारनमध्ये नवविवाहितेवर भरदिवसा गोळीबार

  • एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला केला

  • जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक

  • महिलेवर अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरू

  • घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

पंजाबमध्ये नवविवाहितेवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंजाबच्या तरनतारन येथे ही धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव रुबी मेहरा आहे. ती पट्टी गार्डन कॉलनीमध्ये राहते. रुबीचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आरोपीचे नाव करण आहे. रुबीचे लग्न झाल्यापासूनच करण सतत तिला त्रास देत होता. रुबीचे लग्न झाल्याचे सहन न झाल्यामुळे शनिवारी त्याने तिच्या नवऱ्याला मारहाण केली आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या.

रुबी मेहरा आपल्या नवऱ्यासोबत दुचाकीवरून जात होती. आरोपी त्याठिकाणी आला आणि त्याने त्यांचा रस्ता अडवला. सुरूवातीला आरोपी करणने रुबीच्या नवऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रुबी तिथून पळून जाऊ लागली असता त्याने तिचा पाठलाग करत तिच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी रुबीच्या डोक्यात तर दुसरी गोळी तिच्या शरीरात घुसली. रुबीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Crime: कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडने व्हिला बुक केला; जबरदस्ती गुंगीचे औषध पाजलं, नंतर...

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या रुबाला स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यत आले. पोलिस सध्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Nashik Crime : नाशिकमध्ये खळबळ! ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, २० वर्षीय तरुणाचं हैवानी कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com