मालेगावमध्ये ७ वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराची संतापजनक घटना
स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
परिसरातील सुरक्षेअभावी नागरिकांचा संताप
घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण
अजय सोनावणे, मनमाड
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरले आहे. एका ७ वर्षाच्या मुलीवर २० वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल जवळील जुन्या महानगर पालिकेसमोर पीडित मुलगी मैत्रिणींसोबत खेळत होती. यादरम्यान नराधम तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती समजताच तेथील स्थानिकांनी संशयीताला वेळीच पकडून किल्ला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील सदर या संशयित नराधमाने एका लहान मुलावर देखील असेच गैरकृत्य केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान टाऊन हॉल परिसरात तुडक्या भिंती इमारती, संरक्षक गेट नीट नसणे यामुळे हा परिसर नेहमीच नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे येथे वेळीच महानगर पालिका आणि पोलिस प्रशासनाने मिळून यावर अंकुश आणला पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याघटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेने मालेगावात पुन्हा खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.