Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात ७ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. मुलीच्या धाडसामुळे आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली असून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ
Sambhajinagar Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • सावत्र वडिलांकडून ७ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

  • मुलीच्या धाडसामुळे आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपी पकडला

  • पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

  • मुलीची वैद्यकीय तपासणी व संरक्षणासाठी बालकल्याण समितीकडे प्रक्रिया सुरू

माधव सावरगावे,छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात सात वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी अनर्थ टळली. संबंधित कुटुंब तिसगाव येथील खवडा डोंगर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी ही आईच्या पहिल्या विवाहातील असून आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील मजुरीचे काम करतात.

घटनेच्या दिवशी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सावत्र वडिलाने मुलीला घरात एकटी पाहून तिचे कपडे काढून तिला मांडीवर बसवले आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केली; मात्र त्याने सोडले नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीने सावत्र वडिलाच्या हाताला चावा घेतला आणि संधी साधून तेथून पळ काढला.

Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ
Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

मद्यधुंद अवस्थेमुळे आरोपीला तिचा पाठलाग करता आला नाही. मुलगी थेट शेजाऱ्यांच्या घरी धावत गेली. परिसरातील महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडून चोप दिला व तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्या असून शरीरावर चाव्याचेही खुणा असल्याचे समोर आले आहे.

Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ
Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित व्यक्तीकडून संशयास्पद प्रकार घडत असल्याची चर्चा होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार हे करीत आहे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलीला संरक्षणासाठी बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com