मुंबई हादरली! दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू
जुहूनंतर गोवंडीत घडली धक्कादायक घटना
गोवंडीतील गोळीबारात तरुणीचा मृत्यू
तरुणीच्या मृत्यूने परिसरात खळबळ
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबईच्या जुहू कोळीवाडा चौपाटीवर पोत्यात पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना गोवंडीत गोळीबाराची घटना घडली आहे. गोवंडीतील गोळीबारात १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली. या विभागात एका तरुणाने १९ वर्षीय तरुणीवर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक संबंधामुळे गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारानंतर तरुणीला जवळील रुग्णालयात दाखल केले. परंतु दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच त्यांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. या चौकशीनंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
तरुणीच्या मृत्यूनंतर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी विशेष पथक देखील तैनात केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
जुहूच्या समुद्र किनार्यावर आढळला मृतदेह
जुहू कोळीवाडा समुद्र किनाऱ्याजवळ एक पोत्यात पुरुषाचा मृतदेह सापडला. पोत्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शिर नसल्याने ओळख पटवणे कठीण झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

