२७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा अपघातात जागीच मृत्यू, क्रीडाविश्वावर शोककळा

palghar accident : २७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. संभाजी पाटील यांच्या मृत्यूने क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.
palghar accident news
palghar accidentSaam tv
Published On
Summary

पालघरमध्ये भीषण अपघात

नेमबाज संभाजी पाटील यांचा मृत्यू

संभाजी पाटील यांच्या मृत्यूने क्रीडाविश्वावर शोककळा

पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. संभाजी शिवाजी पाटील या २७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा पालघरच्या मनोर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी पाटील यांच्या मृत्यूने क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.

palghar accident news
300 कुटुंब बेघर होणार; 15 दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस, रहिवाशांमध्ये खळबळ

संभाजी पाटील हे पुण्याहून गुजरातकडे जात असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ भरधाव कारने अवजड वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात नेमबाजा संभाजी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी यश प्रशांत चौधरी (२२) गंभीर जखमी झाला. भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघात नेमका कसा झाला?

संभाजी पाटील सोमवारी पुण्याहून खासगी कारने अहमदाबादमध्ये प्रशिक्षणासाठी जात होते. संभाजी पाटीलची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावात आली. त्यानंतर महामार्गावर जाताना डाव्या बाजूला एका ट्रक उभा करण्यात आला होता. भरधाव कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात संभाजी पाटील यांचा जागीच प्राण गेला.

कोण होते संभाजी पाटील?

संभाजी पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील पारिजात नगर सिडको कॉलनीत राहायला होते. ते उच्चशिक्षित आणि अत्यंत कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी नेमबाजीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलं होतं.

palghar accident news
पुणे जिल्हा परिषदेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता; वाचा विजयी उमेदवारांची यादी

२०१८: ५३ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत (२५ मीटर पिस्तूल सांघिक) सुवर्णपदक मिळवलं होतं.

२०१९: ५४ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक २५ मीटर शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

२०२०: मध्य रेल्वे आयोजित चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

palghar accident news
ZP Election : माजी मंत्र्याला मोठा धक्का; कुटुंबातील ५ पैकी ४ पराभूत, मतदारांनी घराणेशाही नाकारली

कंटेनरचा भीषण अपघात

पालघरमधील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हायड्रोक्लोराइड लिक्विड वाहतूक करणारा टँकर थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. टँकर चालक मद्यप्राशन करून नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com