

शिर्डीच्या लक्ष्मीनगर भागातील रहिवाशांचं टेन्शन वाढलं
15 दिवसांत घरे खाली करण्याचे आदेश
नोटिशीमुळे लक्ष्मीनगर परिसरात एकच खळबळ
सचिन बनसोडे, साम टीव्ही
गेली 50 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या शिर्डीच्या लक्ष्मीनगर भागातील इंदिरा गांधी घरकुल योजनेतील तसेच अतिक्रमण म्हणून दाखवण्यात आलं आहे. यामुळे जवळपास 300 कुटुंबांना अवघ्या 15 दिवसांत घरे खाली करण्याचा अल्टिमेटम शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने नोटिसांद्वारे दिल्याने संपूर्ण लक्ष्मीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत होणारी भाविकांची संभाव्य गर्दी आणि शहरातील प्रलंबित रस्ते विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत.. त्यानुसार तातडीची पावले उचलत शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने साई मंदिरालगत असणाऱ्या लक्ष्मीनगर मधील सर्वे नंबर 2 आणि 3 मधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत..
या भागातून 18 मीटर रुंद रिंगरोड प्रस्तावित आहे.. अगोदर तुमचं पुनर्वसन करू आणि नंतर या ठिकाणचं अतिक्रमण काढू असं अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं.. मात्र तत्पूर्वीच आम्हाला विश्वासात न घेता, आमच्याशी कुठली चर्चा न करता शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी 15 दिवसाचा अल्टिमेटम देत आम्हाला घरी खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे..
लक्ष्मीनगर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आणि कुटुंबातील एका व्यक्तीस रोजगार देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक भूमिका आहे.. मात्र मी प्रभागाचा नगरसेवक असूनही शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने मला कल्पना न देता रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटीस दिल्या असल्याचे मंगेश त्रिभुवन यांनी म्हटलंय..
पालकमंत्री आणि माजी खासदार यांच्यापेक्षा मोठा व्यक्ती मुख्याधिकारी झालेला आहे का? असा प्रश्न स्थानिक नेते सुरेश आरणे यांनी उपस्थित केलाय.. जे लोकप्रतिनिधी या प्रभागातून निवडून आलेले आहेत, त्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता स्वतःची मनमानी सुरू असल्याचा प्रकार शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप आरणे यांनी केलाय..
दरम्यान, नोटीस मिळालेल्या नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी जोर धरू लागली असून शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय.. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अतिक्रमण काढू देणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.. त्यामुळे शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.