अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात? उत्तर मिळाले पाहिजे; राष्ट्रवादीच्या आमदाराने मनातलं सगळं सांगितलं

ajit pawar plane crash : अजितदादांच्या विमानाचा अपघातावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावरून आता अमोल मिटकरी यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
Ajit pawar
Ajit pawar Accident Saam tv
Published On
Summary

अजित पवारांच्या विमान अपघातावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित

अमोल मिटकरींचा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल

अक्षय गवळी, साम टीव्ही

अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. अजितदादांच्या अपघाताविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यासहित अमोल मिटकरी यांच्याकडून संशय व्यक्त केला जात आहे. या संशयावरून लोकांमध्ये संम्रभ निर्माण होत आहे. यावरूनच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली. संजय शिरसाट यांच्या टीकेला आता आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

अजित पवार जिवंत असल्याचे दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे खासदार बजरंग सोनावणे यांनीही अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांच्या मृत्यूवरून संभ्रम निर्माण करण्याऱ्या नेत्यांना संजय शिरसाट यांनी झापलं होतं. संजय शिरसाट यांच्या टीकेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Ajit pawar
मोठी बातमी! इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता

अमोल मिटकरी काय म्हणाले?

'पाषाण हृदयाच्या माणसाला दुःख कळेल की नाही याबद्दल मनात शंका आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याच कारचा अपघात होणार होता, असं त्यांनीच किस्सा सांगितला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला असता आणि मंत्री शिरसाटांचं काही बरं वाईट झालं असतं, तर कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचं सावट नसतं कां? असा सवाल मिटकरी यांनी केला.

'अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात शंकचे काहूर आहे. त्याचे उत्तर मिळाली पाहिजे. हेच आमचं विचारणं आहे. त्यामुळं संजय शिरसाट यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. आज एखादी व्यक्ती गेली असेल आणि त्यांच्या जाण्याने कुटुंबासह चाहत्यांवर आणि पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही शंका मनात आहेत म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय. उद्या तुमच्या कारचा घातपात झालाय, काही शंका म्हणत असतात विचारलं तर त्यात वाईट काय. देव करो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळो. पण अशाप्रकारे त्यांनी आपली बुद्धी पाजळू नये. आज आम्ही दुःखात असून सर्वांवर दुःखाचं सावट आहे, अशा शब्दात मिटकरींनी खडेबोल सुनावले.

Ajit pawar
Shocking : जिगरी मित्रांनी गुपचूप किटकनाशक औषध प्यायलं; तिघांचा मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज

'राजकीय टोलेबाजी-टीकाटिपणी करून स्वतःच्या हृदयाचा असंवेदशील दाखवून जागतिक प्रदर्शन करू नये. तुम्हाला उत्तर द्यायला शेवटी अनेक प्रसंग येतील. शेवटी एकच सांगतो संजय शिरसाट यांच्यासारख्या पाषण हृदयाची माणसं माणसं अजितदादा जाण्याचं दुःख कधीच समजू शकणार नाही, असेही त्यांनी सांगिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com