स्वेटर जळालेला, पायात चप्पल, हातात बंद घड्याळ; अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवार महत्वाचे बोलले

Rohit pawar on ajit pawar accident : अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 ajit pawar accident
Rohit pawar on ajit pawar accidentSaam tv
Published On
Summary

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झालीये

रोहित पवार यांनी विमान अपघातावर महत्वाचे भाष्य केलं

रोहित पवारांनी अपघातस्थळी काय परिस्थिती होती, त्याची माहिती दिली

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंकेचं काहूर माजलं आहे. अजित पवारांचा घातपात झाल्याचाही संशय राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची कठोर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अजितदादांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

रोहित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी महत्वाच्या मुद्यावर भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, 'एक व्यक्ती म्हणाला, तुम्ही ९ तारखेला अजितदादांबद्दल काही सांगणार होता अपघाताबद्दल...त्याचं काय झालं... त्यावेळी त्यांना १० तारखेला याबाबतीत मला काय वाटतं ते सांगणार आहे असं म्हणालो. काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत. या व्हिडिओमध्ये दादा परत येतील. सहा जण विमानात होते. सहावी व्यक्ती दादा होते. ती बॉडी दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील.. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारील'.

 ajit pawar accident
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा बोलबाला; जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

'अजितदादांचा अपघात झाला, ते स्वप्न होतं. मला असं वाटत होतं. कधीपर्यंत...जेव्हा दादांचा एक स्वेटर जळालेला, पायात चप्पल, हातात बंद घड्याळ...दादा कधीही त्यांचा वेळ १५ मिनिटे पुढे ठेवायचे. ते बंद घड्याळ मी बघितलं. ज्यांनी बघितलं ते निशब्द झाले होते. जी घटना झाली नाही, असं ज्यांना वाटतं. पण ही घटना झाली आहे. आज अजितदादा नसले तरी, तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.

'अजितदादांनी मुंबईहून बारामतीला विमान प्रवास केला. २१० किमी विमान अंतर होते. त्यांना प्रवासासाठी २७ मिनिटे लागणार होती. विमान हे व्हीएसआर बंबार्डियर नावाच्या कंपनीचं होते. अमेरिकेत हे विमान तयार झालंय. २०१० साली हे विमान तयार झालं. हे विमान वेगवान असतं. ते ५१ हजार फूट उंचावरून जाऊ शकतं. या विमानात अंदाजे डाव्या बाजूला बसले होते. त्याच बाजूला बॅगा किंवा सामान बाजूला ठेवले जातात. तिथे पेट्रोलच्या टाक्या असतील असं समजायला हरकत नाही, असेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com