Maharashtra Weather Updates
राज्यात मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, घाट परिसरातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.