Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

अवैध विदेशी दारुची वाहतूक; ७ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारंजा ते शेलुबााजार रस्त्यावरील शेवती शिवारात व बेलमंडळ येथील एका घरातून अवैध विदेशी दारू जप्त करुन कारवाई केली. शेवती शिवारात वाहतूक करणारी चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी सचिन काशिनाथ एकनार रा. बेलमंडळ ता. कारंजा व कैलास अवधूत ढोक रा. इंझोरी यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनासह अंदाजे ७ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंद्रपूर मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना अटक

चंद्रपूर महानगरपालिकेतील रमाई शहरी आवास योजनेतील कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. शुभम वरघाट असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी इंजिनिअरचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराचे काम मंजूर करून देण्यासाठी आणि फाईल पुढे सरकवण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापडा रचून अभियंत्याला अटक केली. पुढील तपास चंद्रपूर लाचलुचपत विभाग करीत आहे.

परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत त्यांचे आरोपी अद्याप पर्यंत सापडले नाहीत मात्र त्यांचाच मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये एका व्यक्तीने त्याला अडवून तू कोणाचा आहे असे विचारले आणि त्याने मी महादेव मुंडे यांचा आहे असे सांगितल्यानंतर दोन कानाखाली झपडा हाणून मारहाण केली आहे मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो वाल्मीकरांचा समर्थक असल्याचं साम टीव्ही शी बोलताना नातेवाईकांनी सांगितले आहे मारहाण का झाली कशामुळे झाली याची चौकशी आता परळी पोलीस करत असून अज्ञात विरुद्ध परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

शिर्डीत तरुणावर चाकू हल्ला

राहाता येथील दानिश चौधरी या तरुणावर शिर्डीत जीवघेणा हल्ला...

हल्ल्यात तरुण गंभीर जखमी...

मस्जिदमध्ये नमाज पढवण्यासाठी आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी केले वार...

तरुणावर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू...

पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू...

शिर्डी पोलिस ठाण्यासमोर जमला मोठा जमाव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com