Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात कुठेही गारपीट होण्याची शक्यता नाही, गारपीट होण्यासारखं वातावरण पूरक नाहीये. दरम्यान मार्चनंतर तापमान वाढत राहण्याची शक्यता असल्याचं एस. डी. सानप हवामान शास्त्रज्ञ म्हणालेत.
Maharashtra Weather Update:
Dark clouds hover over parts of Vidarbha as unseasonal rain continues across Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज.

  • विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट.

  • गारपीट होण्याची शक्यता नसल्याचं हवामान तज्ज्ञांचे मत.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

मागील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे असणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.

दक्षिणेकडील येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे गेले काही दिवस तापमान ३० पेक्षा जास्त झाला आहे. अशा परिस्थितीत ढग तयार होऊन हा पाऊस पडत आहे. पुढील २ ते ३ दिवस दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रविवारी पाऊस झाला आहे. येणाऱ्या काही दिवसाचा अंदाज बघितला तर सांगली, सोलापूर,धाराशिव लातूर,नांदेड,हिंगोली तसेच पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजेच्या गडगडाटसह पाऊस पडू शकतो.

Maharashtra Weather Update:
Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

पुढील दोन ते तीन दिवस हलक्या,मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, तर विदर्भात विजेच्या गडगडांसह जास्त पाऊस पडेल, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही शेतकरी गारपाटी ही होईल अशी भीती व्यक्त करत आहेत. मात्र राज्यात कुठेही आता तरी गारपीट होण्याची शक्यता नाहीये.

गारपीट होण्यासारखं वातावरण पूरक नाही. हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जाताना वातावरण बदलत आहे. तापमान वाढत कमी होतं या महिन्याच्या शेवटपर्यंत असं राहील मात्र मार्चनंतर तापमान वाढत राहण्याची शक्यता आहे, असं हवामान प्रमुख पुणे विभाग एस. डी. सानप म्हणालेत.

Maharashtra Weather Update:
Weather Update: हवामान बिघडलं! गडगडाटी वादळ, पाऊस अन् बर्फवृष्टी; महाराष्ट्रासह अनेक राज्यांना IMDकडून अलर्ट

मराठवाड्यातील धाराशिवसह हिंगोलीत सोमवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. लातूर शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. यवतमाळच्या राळेगाव, मारेगाव, महागाव,आर्णी, उमरखेड, पुसद,दिग्रस तालुक्यात दुपारी गारपीठ आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला.रब्बी हंगामातील गहू, हरबरा, पालेभाज्या या पिकांना मोठा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com