Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

7 Engineering Students from Maharashtra Drown at Chennai: चेन्नईमध्ये महाराष्ट्रातील ७ मुला-मुलींचा बुडून मृत्य झाला. हे सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. जळगावचा एक तरुण अद्यापही बेपत्ता आहे.
Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?
Chennai Golden BeachSaam Tv
Published On

Summary -

  • चेन्नईतील गोल्डन बीचवर मोठी दुर्घटना

  • महाराष्ट्रातील ७ भावी इंजिनिअर्सचा समुद्रात बुडून मृत्यू

  • सेल्फी घेत असताना मोठ्या लाटेमुळे १५ तरुण वाहून गेले

  • मृतांमध्ये ३ मुली आणि ४ मुलांचा समावेश

महाराष्ट्रातील ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईतील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जळगावचा तरुण जय अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. चेन्नईतील गोल्डन बीचवर शनिवारी ही दुर्घटना घडली. हे सर्व तरुण-तरुणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. चेन्नईतील कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये ते इंटर्नशिप करण्यासाठी गेले होते. शनिवारी सुट्टी असल्यामुळे हे सर्व मुलं आणि मुली पाँडिचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते.

ही सर्व मुलं आणि मुली गोल्डन बीचवर मजामस्ती करत होते. सर्वजण एकत्र येत सेल्फी काढत होते. त्याचवेळी एक मोठी लाट आली आणि ती या सर्व मुलांना सोबत घेऊन गेली. सर्वच्या सर्व १५ मुलं समुद्रात बुडाली. यामधील ७ जणांचा मृतदेह आतापर्यंत सापडला आहे. यामध्ये तीन मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. भंडारा, नागपूर, नांदेड, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ही सर्व मुलं आहेत. तर जळगावच्या जय पाटीलसह आणखी काही जण अद्याप बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे.

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?
Suruchi Beach Vasai : मुंबई जवळ वसलेला आहे 'हा' शांत समुद्रकिनारा, फॅमिली फ्रेंड्ससोबत वीकेंडला नक्कीच भेट द्या

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. या सर्व मुलांचा स्थानिक प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. महाराष्ट्र सरकार पीडित कुटुंबीयांसोबत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रामध्ये बुडालेल्या मुला-मुलींचे पालक तातडीने चेन्नईला गेले आहेत. मुलांच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com