Suruchi Beach Vasai : मुंबई जवळ वसलेला आहे 'हा' शांत समुद्रकिनारा, फॅमिली फ्रेंड्ससोबत वीकेंडला नक्कीच भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वसई सुरुची बीच

पालघर जिल्ह्यातील वसईजवळील सुरुची बीच हे निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनार्‍यांपैकी एक आहे. गर्दीपासून दूर, रिलॅक्स होण्यासाठी हा समुद्रकिनारा बेस्ट आहे.

Vasai | GOOGLE

स्वच्छ आणि सुंदर बीच

स्वच्छ वाळू, लाटांचा शांत आवाज आणि लांबलचक किनाऱ्यामुळे सुरुची बीच खूप सुंदर दिसतो. सकाळी आणि संध्याकाळी इथले दृश्य खास बघण्यासारखे असते.

Suruchi Beach | GOOGLE

कसे जायचे?

वसई रोड स्टेशनवर उतरून ऑटो किंवा बसने सुरुची बीचला जाता येते. मुंबईहून जायचे असेल तर कारने किंवा ट्रेनने तुम्ही सहज जावू शकता.

Auto | GOOGLE

सनसेटचा आनंद

सुरुची बीचवरील सनसेटची दृश्ये अत्यंत सुंदर असतात. सनसेट पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळीस पर्यटक गर्दी करतात.

Sunset View | GOOGLE

फोटोसाठी परफेक्ट ठिकाण

निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हा बीच परफेक्ट आहे. संध्याकाळच्या वेळीस येथे बेस्ट फोटोशूट तुम्ही करु शकता. सुरुची बीचवर प्रीवेडिंग शूट सुध्दा करता येते. तसेच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुंदर फोटोज् काढू शकता.

Photoshoot | GOOGLE

शांतता आणि रिलॅक्सेशन

गर्दी कमी असल्यामुळे शांततेत बसू शकता. स्व:ताचा मी टाइम समुद्राकडे बघून स्पेंड करु शकता.

Suruchi Beach | GOOGLE

कुटुंबासोबत वेळ घालवणे

फॅमिली पिकनिकसाठी सुरुची बीच ही जागा एकदम योग्य आहे. मुलांसाठी मोकळी जागा आणि मोठ्यांसाठी शांत वातावरण येथे आहे.

Family Time | GOOGLE

काय सोबत न्यावे?

इथे जास्त फूड स्टॉल्स नसल्यामुळे, घरातून सोबत खाण्यासाठी घेवून जा. पाणी, स्नॅक्स आणि कचरा टाकण्यासाठी पिशवी सोबत न्या.

Suruchi Beach | GOOGLE

India Travel : जगातील 5 सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Foreign Travel | GOOGLE
येथे क्लिक करा