ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारता जवळील देश नेपाळला तुम्ही फिरायला जावू शकता. नेपाळला जाण्यासाठी व्हिजा लागत नाही आणि कमी बजेटमध्ये ट्रिप करु शकता.
नेपाळमध्ये भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही काठमांडू, पोखरा आणि राष्ट्रीय उद्यानांसारख्या ठिकाणी भेट देऊ शकता.
सिंगापूर हा एक स्वस्त देश मानला जातो. तुम्ही कमी बजेटमध्ये येथे प्रवास करू शकता. सिंगापूरला भेट देण्यासाठी तुम्हाला व्हिजा आवश्यक आहे.
सिंगापूर जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी तुम्हाला फक्त १ लाख रुपयांची गरज लागेल. या पैसात तुमची फॉरेन ट्रिप करु शकता.
थायलॅंडला जास्त प्रमाणात कपल्स आणि फॅमिली फिरण्यासाठी जातात. थायलॅंड ही फिरण्यासाठी चांगली जागा मानली जाते.
भारतीयांनी थायलॅंडला जायला व्हिजाची गरज लागत नाही. येथे तुम्ही विना व्हिजा शिवाय ६० दिवसांपर्यंत राहू शकता.
तुम्ही व्हिएतनामलाही फिरायला जावू शकता. व्हिएतनामच्या ट्रिपसाठी तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.
व्हिएतनाममध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही फॅमिली ट्रिपसाठी किंवा हनिमूनसाठी तिथे जाऊ शकता.
तुम्ही भारताचा शेजारील देश श्रीलंकेलाही कमी बजेटमध्ये जावून फिरु शकता. तिथे प्रवास करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता लागत नाही.
श्रीलंकाला फिराला जाण्यासाठी तुम्हाला ५० ते ६० हजार रुपये लागतील. तेथे तुम्हाला फिरण्यासाठी अनेक जागा आहेत.