Kokan Tourism: शुभ्र वाळू, सोनेरी खडक आणि...! कोकणात इतका सुंदर बीच तुम्ही पाहिलाच नसेल

Surabhi Jayashree Jagdish

किल्ले निवती बीच

किल्ले निवती बीच हा कोकणातील निसर्गसंपन्न आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. निळाशार समुद्र, स्वच्छ वाळू आणि गर्दीपासून दूर असलेला परिसर यामुळे हा बीच खास मानला जातो.

वेंगुर्ल्यापासून जवळ

किल्ले निवती बीच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. हा बीच निवती गावाजवळ आहे. कोकणातील कमी प्रसिद्ध पण अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे.

ऐतिहासिक बाबी

निवती किल्ला हा समुद्रकिनाऱ्यालगत असलेला छोटा पण महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी याचा वापर होत होता.

बीचची खासियत

निवती बीच स्वच्छ, शांत आणि नैसर्गिक स्वरूपात आजही टिकून आहे. इथे गर्दी कमी असल्यामुळे निवांत वेळ घालवता येतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस समुद्राचं दृश्य सुंदर दिसतं.

पाहण्यासारख्या गोष्टी

निवती किल्ल्याचे अवशेष, समुद्रकिनारा आणि आसपासची हिरवीगार झाडी पाहण्यासारखी आहे. किनाऱ्यावर चालत फिरताना छोटे खडक, शंख-शिंपले पाहायला मिळतात.

मंदिरं

निवती गाव परिसरात स्थानिक ग्रामदेवता आणि छोटी मंदिरे आहेत. कोकणातील पारंपरिक जीवनशैली इथे जवळून पाहता येते. स्थानिक लोक मासेमारीवर अवलंबून असून त्यांचं साधं-सोपं जीवन आकर्षक वाटतं.

कसं पोहोचाल?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला किंवा सावंतवाडी इथून निवती बीचला जाता येतं. सावंतवाडीहून बाय रोड थेट निवती गावापर्यंत पोहोचता येतं. जवळचं रेल्वे स्टेशन सावंतवाडी रोड आहे.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा