Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

Surabhi Jayashree Jagdish

कडीपत्त्याची चटणी

जेवताना दररोज काहीतरी तोंडी लावायला म्हणून आपण लोणचं घेतो. मात्र लोणचं नसल्यास तुम्ही ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी ताटात घेऊ शकता. ही चटणी तिखट आणि अगदी झटपट तयार होते.

कोथिंबीर आणि कढीपत्ता वाळवणं

कोथिंबीर आणि कढीपत्ता स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळून घ्या. ओलावा राहिल्यास चटणी टिकत नाही म्हणून नीट सुकवणं महत्त्वाचं आहे. उन्हात किंवा फॅनखाली काही वेळ ठेवले तर उत्तम.

मिरची आणि लसूण भाजणं

हिरव्या मिरच्या तुकडे करून कोरड्या तव्यावर हलक्या भाजून घ्या. यामुळे मिरचीचा ओलावा कमी होतो आणि चटणी सुकी राहते. आवडीने दोन-तीन लसूण पाकळ्या भाजून घालू शकता.

शेंगदाणा किंवा डाळ

कोरड्या तव्यावर शेंगदाणे किंवा चणाडाळ हलकी भाजा. यामुळे चटणीला भरदारपणा आणि मस्त सुगंध मिळतो. हे घटक चटणीला कुरकुरीत टेक्स्चर देतात.

मसाले भाजून घेणं

जिरे, धणे, सुक्या लाल मिरच्या आणि थोडं मीठ कोरड्या तव्यावर भाजा. भाजलेल्या मसाल्यांनी चटणीची चव दुप्पट वाढते. चवीप्रमाणे लाल मिरची कमी-जास्त करा.

सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवणं

कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, शेंगदाणे, डाळ आणि मसाले मिक्सरमध्ये घालून रफ पावडर करा. खूप बारीक वाटू नका.

मीठ आणि तिखट चवीनुसार

वाटून झाल्यानंतर मीठ, तिखट किंवा आंबटपणा कमी-जास्त करा. चिमूटभर साखर घातल्यास चव संतुलित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा