Rohit Mane Bought New Home: 'स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न...'; हास्यजत्रा फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं अलिशान घर

Rohit Mane News: अभिनयाच्या जोरावर अभिनेता रोहित मानेने आपले स्वप्न साकार केले आहे. मुंबईमध्ये नवं घर खरेदी केले असल्याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावरून दिली आहे.
Rohit Mane Bought New Home
Rohit Mane Bought New HomeInstagram

Rohit Mane Bought New Home

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडी शो कायमच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करते. शो प्रमाणेच शो मधील कलाकारही कायमच आपल्या कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतात. गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब, निखिल परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत आणि रोहित माने या कलाकारांनी आपल्या खास मनोरंजन स्टाईलने मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रोहित माने. आपल्या चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमातून हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित मानेने आपले स्वप्न साकार केले आहे. मुंबईमध्ये नवं घर खरेदी केले असल्याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावरून दिली आहे. (Marathi Actors)

Rohit Mane Bought New Home
Anupam Kher: अयोध्येत दाखल होताच अनुपम खेर यांनी घेतलं हनुमान गढीचं दर्शन; म्हणाले, “प्रभू श्रीराम यांच्याआधी…”

रोहित मानेने मुंबईतल्या दहिसरमध्ये स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आहे. त्याने सोशल मिडियावर नव्या घराचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबत घराच्या किल्लीचा फोटो अभिनेत्याने शेअर केला आहे. अभिनेता आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतो, "मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमीत्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली." (Social Media)

"त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं. जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही. पण श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस, त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो... होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव." (Maharashtrachi Hasyajatra)

Rohit Mane Bought New Home
Bhuvan Bam Net Worth: प्रसिद्ध कॉमेडियन कमी वयातच झाला कोट्यवधींचा मालक; नेटवर्थ पाहून डोळेच फिरतील

"ह्या सगळयात माझे आई वडील, माझे सासू सासरे, हयांनी कायमंच आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पुर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून..." अभिनेत्याच्या नव्या घराची पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

दरम्यान, रोहित मानेच्या कामाबद्दल सांगायचे तर, रोहित मानेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. हास्यजत्रे व्यतिरिक्त तो लवकरच एका चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत अभिनेता किरण मानेही दिसणार आहे. त्यांनी अद्याप चित्रपटाबद्दल माहिती दिली नाही. (Entertainment News)

Rohit Mane Bought New Home
Kangana Ranaut Video : अयोध्येमध्ये पोहचतात रामभक्तीत तल्लीन झाली कंगना रनौत, हनुमान गढी मंदिरात झाडू मारत केली स्वच्छता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com