सध्या सोशल मीडियाची तरुणाईंमध्ये खूपत क्रेझ आहे. या सोशल मीडियावर अनेक असे कंटेंट क्रिएटर आहेत जे आपल्या हटक्या पद्धतीतल्या व्हिडीओंमुळे जबरदस्त चर्चेत असतात. त्यातीलच एक दिल्लीतील (Delhi) लोकप्रिय यूट्यूबर, लेखक, गायक, गीतकार आणि कॉमेडियन भुवन बाम (Bhuvan Bam). भुवन बामचा आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत. (Entertainment News)
सोशल मीडियावर कंटेंट तयार करुन अनेक इन्फ्लूएंसर्स मोठी कमाई करतात. इन्स्टाग्रामपासून यूट्यूबपर्यंत कोणत्याही सोशल मीडियावर पॉप्युलर क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. या माध्यमातून ते भरघोस कमाई करतात. त्यातीलच एक भुवन बाम आहे. भुवन बामने युट्यूबच्या जोरावर जवळपास १२२ कोटींची संपत्ती कमावली आहे.
खरंतर त्याला गायक बनायचे होते. पण तो एक प्रसिद्ध कॉमेडियन झाला. तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी स्टँडअप कॉमेडी करायचा. त्यानंतर त्याने आपल्या व्हिडीओ बनवून युट्यूबवर अपलोड केल्या आणि त्यातून त्याला हळूहळू प्रसिद्धी मिळत गेली. युट्यूबच्या मार्फत तो महिन्याला हजारो रुपये कमवयाचा. आज तो महिन्याला लाखो रुपये कमावतो. (Social Media)
अनेकांची मिमिक्री करत त्याने प्रसिद्धी मिळवली. 'BB की Vines' नावाच्या कॉमेडी युट्यूब चॅनलवर तो आपल्या व्हिडीओ अपलोड करायचा. त्याच्या व्हिडीओ अनेकदा काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या होत्या. याच माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली आणि तो आज एक प्रसिद्ध युट्यूबर झाला. त्याने युट्यूबच्या माध्यमातून मिळत असलेल्या पैशांवर दिल्लीमध्ये ११ कोटींचा आलिशान बंगलाही खरेदी केला. दक्षिण दिल्लीमध्ये त्याने हा बंगला खरेदी केला असून त्यासाठी त्याने सुमारे ७७ लाख रुपयांचा स्टॅम्प ड्युटीही भरला. फारच कमी वयात त्याने मोठं नाव कमावलं आहे. (Bollywood)
कॉमेडियन आणि युट्यूबर भुवन बामचं खरं नाव भुवन अरविंद्र शंकर बाम असे आहे. त्यांच्या कामामुळे तो लोकांमध्ये भुवन बाम म्हणून लोकप्रिय आहे. भुवन बाम हा मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. भुवनला लहानपणापासूनच गाण्याची आणि नवीन क्रिएटीव्हिटीची आवड आहे. त्यांचा आवाज खूपच चांगला आहे त्यामुळे त्याने गायनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
भुवनने दिल्लीतील एका छोट्या रेस्टॉरंटमधून आपल्या गायनाची सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत तो महिन्याला फक्त ५,००० रुपये कमवू शकत होता. भुवन बाम यांचे वैशिष्ट्य म्हणजे गाणी गाण्यासोबतच तो स्वत: गाणी लिहितो देखील. भुवन बामने दिल्लीतील ग्रीन फील्ड स्कूलमधूल शिक्षण घेतले. त्यांनी शहीद भगतसिंग महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.