Maidaan Movie: अजय देवगण देणार अक्षय कुमारला जोरदार टक्कर, ईदच्या दिवशी 'मैदान' होणार रिलीज

Ajay Devgn Maidaan Movie: अजय देवगणचा मैदान ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्यात दिवशी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट (Bade Miyan Chote Miyan Movie) देखील रिलीज होणार आहे.
Ajay Devgn And Akshay Kumar
Ajay Devgn And Akshay KumarSaam Tv
Published On

Maidaan Movie Release Date:

बॉलिवूड (Bollywood) अ‍ॅक्शन स्टार अर्थात अजय देवगण (Ajay Devgan) 2024 या वर्षामध्ये बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाला आहे. या वर्षामध्ये अजय देवगणचे अनेक बॅक टू बॅक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या तो काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर त्याच्या काही चित्रपटांची घोषणा देखील झाली आहे.

अशामध्ये आता अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची (Maidaan Movie) रिलीज डेटही समोर आली आहे. आता अजय देवगणचा मैदान ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्यात दिवशी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट (Bade Miyan Chote Miyan Movie) देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सुपरस्टारची जोरदार टक्कार होणार आहे.

अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा बदलण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणच्या चित्रपटाला रिलीजची नवी तारीख मिळाली आहे. अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट यावर्षीच्या ईदला म्हणजेच 2024 ला रिलीज होणार आहे. अशातच अजय देवगणने अक्षय कुमारला थेट आव्हान दिले आहे. अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही ईदला प्रदर्शित होणार आहे.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंट म्हणजे ट्विटर हँडलवर अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. अमित शर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला अजय देवगणचा मैदान चित्रपट 2024 च्या ईदला प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बोनी कपूर आणि झी स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अशाप्रकारे अजय देवगणने अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातून थेट आव्हान स्वीकारले आहे. अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही ईदला प्रदर्शित होणार आहे.

Ajay Devgn And Akshay Kumar
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आयशा खान, मुनव्वर फारुकीने मागितली एक्स गर्लफ्रेंडची माफी

अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम हे 1950 ते 1963 पर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाशी संबंधित होते. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अजय देवगणच्या हातामध्ये सध्या 'मैदान', 'शैतान', 'औरों में कहां दम था', 'सिंघम अगेन', 'रेड 2' हे चित्रपट हातामध्ये आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून तो दमदार भूमिका साकारणार आहे.

Ajay Devgn And Akshay Kumar
Ram Aayenge Song: जर्मनीच्या गायिकेने गायलं 'राम आएंगे' गाणं, सौंदर्यासोबत मधुर आवाजाचे झाले सारे दिवाने; एकदा VIDEO बघाच...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com