Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला माहितच असेल Reliance Jio कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लान सादर करत असते. कंपनीकडे सध्या सुमारे 51 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यांना कमी किमतीत जास्त काळ सेवा मिळावी यासाठी पुढील प्लान खूप फायदेशीर ठरणार आहे.
युजर्सना या प्लानमुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. एकाच प्लानमध्ये कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा मिळणार आहेत.
Jio च्या या प्रीपेड रिचार्जची एकूण किंमत 2025 रुपये आहे. ही अत्यंत कमी किंमत आहे.
जिओच्या ग्राहकांना यामध्ये तब्बल 200 दिवस हा प्लान वापरता येणार आहे.
सर्व नेटवर्कवर लोकल आणि STD अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असणार आहे. तसेच ग्राहकांना दररोज 100 फ्री SMS करता येतील.
जिओच्या या प्लानमध्ये एकूण 500 GB डेटा असणार आहे. याचा ग्राहकांना पुरेपुर वापर करता येणार आहे.
युजर्स दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा वापरू शकतात. 200 दिवसांची वैधता असल्यामुळे अर्ध्या वर्षापेक्षा जास्त काळ रिचार्जचं टेन्शन यामध्ये राहणार नाही.
तुम्हाला या प्लानमध्ये 3 महिन्यांसाठी JioHotstar आणि JioTV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.