Satish Joshi Death: ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवर घेतला अखेरचा श्वास
Famous Marathi Actor Satish Joshi Passed Away While Performing On StageSaam TV

Satish Joshi Dies: ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवर घेतला अखेरचा श्वास

Marathi Veteran Actor Satish Joshi Passed Away: ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Published on

मराठी सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त त्यांचे मित्र आणि अभिनेते राजेश देशपांडे यांनी दिले आहे.

Satish Joshi Death: ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवर घेतला अखेरचा श्वास
Sunny Leone Birthday : 'करणजीत कौर' कशी बनली 'सनी लिओन', जाणून घ्या...

अभिनेते राजेश देशपांडे यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत सतीश जोशी यांच्या निधनाचे वृत्त दिलेले आहेत. "आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दु:खद निधन झाले आहे.जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता. ओम शांती ओम" अशी पोस्ट त्यांनी शेअर केलेली आहे.

'सृजन द क्रिएशन' संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सतीश जोशीही सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच स्टेजवर कोसळून त्यांचे निधन झाले आहे. सतीश जोशी यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांसह मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सतीश जोशी कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आठवणीत राहतील. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Satish Joshi Death: ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवर घेतला अखेरचा श्वास
Mr. And Mrs Mahi Trailer : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स... 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com