Mr. And Mrs Mahi Trailer : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स... 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

Mr. And Mrs Mahi Trailer Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे.
Mr. And Mrs Mahi Trailer Out
Mr. And Mrs Mahi Trailer OutSaam Tv

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'(Mr and Mrs Mahi Movie) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. टीझर आणि पोस्टर्स शेअर करत क्रिकेटप्रेमींची निर्मात्यांनी उत्सुकता वाढवली होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Mr. And Mrs Mahi Trailer Out
Milind Gawali : "आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; मिलिंद गवळी यांची ‘Mothers Day’ निमित्त भावूक व्हिडीओ व्हायरल

'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'मध्ये राजकुमार राव महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेत तर जान्हवी कपूर महिमाच्या भूमिकेत दिसणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित चित्रपट क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित आहे.. दोन क्रिकेट प्रेमी स्वप्न आणि कर्तव्य यांचा कसा संघर्ष करतात हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये प्रेम, क्रिकेटची आवड आणि आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा दाखवण्यात आली आहे.

चित्रपटामध्ये महेंद्र सिंह धोनीची स्ट्रगल स्टोरी, लव्ह लाईफ आणि त्याच्या पत्नीचा क्रिकेट खेळण्यासाठीचा प्रवास आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच घरच्यांकडून मिळणाऱ्या टोमण्यांवर महेंद्र कसं उत्तर देतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ते दोघेही एकमेकांना साथ देत कशाप्रकारे क्रिकेट खेळतात, हे आपल्याला पाहायला मिळेल. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्याशिवाय या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, जरीना वहाब आणि पूर्णेंदू भट्टाचार्य हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही' ३१ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Mr. And Mrs Mahi Trailer Out
‘Mothers Day’ निमित्त आईने दिलेलं गिफ्ट पाहून Hemangi Kavi भावूक; विनोदी कार्यक्रमात भरून आला उर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com