Sunny Leone Birthday : 'करणजीत कौर' कशी बनली 'सनी लिओन', जाणून घ्या...

Sunny Leone News : सनीने आपल्या नावात का बदल केला हे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. जाणून घेऊया तिच्या वाढदिवसाबद्दल...
Sunny Leone Birthday
Sunny Leone BirthdaySaam tv

आपल्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या सनी लिओनीचा आज ४३ वा वाढदिवस. सनीचे चाहते आजच्या दिवशी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आज आपण अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खरं नाव्याबद्दल जाणून घेणार आहोत. सनीचं खरं नाव करनजीत कौर वोहरा असं आहे. तिने आपल्या नावात का बदल केला हे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Sunny Leone Birthday
Mr. And Mrs Mahi Trailer : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स... 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिला सनी लिओन हे नाव कसं पडलं हे सांगितले.. सनीने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत कामाच्या शोधात गेली होती, त्यावेळी तिने तिचे नाव बदलून सनी ठेवले होते. मुलाखतीत सनी म्हणाली, "मी अमेरिकेत एका मॅग्झिनला मुलाखत देत होते. त्यांना माझं नाव करनजीत कौर वोहरा खूप मोठं वाटत होतं. त्यांनी मला विचारलं की, तुला स्वतःचे नाव काय ठेवायचे आहे? त्यावेळी मला कोणतं नावच येत नव्हतं. नंतर त्यांनी मला पुन्हा विचारलं, त्यावेळी मी म्हणाले की, माझे नाव सनी ठेवा आणि तुम्हाला जे आडनाव आवडेल ते ठेवा."

सनी पुढे मुलाखतीत म्हणाली, "खरंतर माझ्या भावाचं नाव संदीप सिंह आहे. आम्ही त्याला प्रेमाने सनी म्हणतो. त्यामुळेच माझ्या मनात सनी नाव आले. मग त्या मॅग्झिनने मला लिओनी हे आडनाव दिले. अशाप्रकारे मी करनजीत कौरची सनी लिओनी झाले. संपूर्ण जग मला सनी लिओनी नावानेच ओळखते. पण माझ्या आईला सनी लिओनी हे नाव आवडत नाही. पण मला त्याच नावाने सर्वात मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे. "

Sunny Leone Birthday
Milind Gawali : "आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; मिलिंद गवळी यांची ‘Mothers Day’ निमित्त भावूक व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी सनीने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. त्यातून तिला स्वतःची इमेज बदलायची होती. सनीने काही वर्षांपूर्वी एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सव्हिला'चं सूत्रसंचालनही केलं होतं. बिग बॉसमध्ये असतानाच सनीला 'जिस्म २' या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर अनेक गाण्यांसोबत चित्रपटांतही काम केले आहे. सनीला 'जिस्म २' नंतर 'रागिनी एमएमएस २', 'एक पहेली लीला', 'मस्तीजादे', 'बेइमान लव', 'रईस', 'तेरा इंतजार', 'बादशाहो', 'भूमी' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Sunny Leone Birthday
‘Mothers Day’ निमित्त आईने दिलेलं गिफ्ट पाहून Hemangi Kavi भावूक; विनोदी कार्यक्रमात भरून आला उर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com