Prathmesh Shivalkar: आई- बाबांच्या डोळ्यातला आनंद महत्त्वाचा... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं मोठं स्वप्न झालं पूर्ण

Maharashtrachi Hasyajatra fame Prathmesh Shivalkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप जास्त आवडतो. कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही.कार्यक्रमातील कलाकार प्रथमेशचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे.
Maharashtrachi Hasyajatra fame Prathmesh Shivalkar
Maharashtrachi Hasyajatra fame Prathmesh ShivalkarSaam Tv

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप जास्त आवडतो. कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रसिद्धी मिळवली आहे. कलाकारांनी आपली स्वप्ने पूर्ण केली आहे. कार्यक्रमातील एका कलाकाराचं आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रथमेश शिवलकरने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने नुकतीच स्वतः महिंद्रा थार ही गाडी विकत घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहीती चाहत्यांना दिली आहे. (Maharashtrachi hasyajatra fame prathmesh shivalkar bought mahindra car)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री चेतना भटने कार खरेदी केली होती. त्यानंतर आता प्रथमेश शिवलकरने आपले स्वप्न केले आहे. त्याने सोशल मीडियावर महिंद्रा थारसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. यांजसाठी केला होता अट्टाहास भाग १ : महिंद्रा थार (MAHINDRA THAR) हे आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद , समाधान आणि कौतुक ……… यांजसाठी केला होता अट्टाहास……. बाकी #realoffroadingstartsnow आणि यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २ ….. लवकरच………, असं कॅप्शन या पोस्टला दिले आहे.

महिंद्रा थार ही आपली ड्रीम कार असल्याचेही प्रथमेशने म्हटलं आहे. प्रथमेशने अगदी कमी वयात खूप मोठे यश मिळवले आहे, असं चाहत्यांनी म्हटले आहे. प्रथमेशच्या या फोटोवर सहकलाकार आणि चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame Prathmesh Shivalkar
Abhradeep Saha : लोकप्रिय युट्यूबरचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वी झाली होती सर्जरी

प्रथमेश हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात कलाकार, लेखक अशा अनेक भूमिका निभावतो. कार्यक्रमातील प्रथमेश- श्रमेशची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडते. दोघांचे अनेक स्कीट खूप जास्त लोकप्रिय झाले आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame Prathmesh Shivalkar
Salman Khan House Firing Case:सलमान खान गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; हरियाणातून एकाच्या मुसक्या आवळल्या, पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com