Viral Video: अवघ्या ७०० रुपयात महिंद्रा थार! चिमुकल्याच्या मागणीवर आनंद महिंद्रांची खास प्रतिक्रिया; VIDEO

Viral Video: व्हिडिओमध्ये एक चिमुकला अवघ्या ७०० रुपयांमध्ये महिंद्राची थार विकत घेण्याचा प्लॅन करतोय. ज्यावर थेट आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे.
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Anand Mahindra Viral Video:

प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. देशभरातील विविध घडामोडींवर ते आपले मत व्यक्त करत असतात. त्यांनी शेअर केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला अवघ्या ७०० रुपयांमध्ये महिंद्राची थार विकत घेण्याचा प्लॅन करतोय. ज्यावर थेट आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे.

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बाप- लेकाची महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडीवरुन चर्चा सुरू आहे. व्हिडिओमधील मुलाचे नाव चीकू आहे. त्याला थार गाडी घ्यायची आहे, ज्याबद्दल तो त्याच्या वडिलांशी चर्चा करतोय. तुमच्याकडे ७०० रुपये असतील तर थार किंवा XUV 700 घेऊ शकता.. असं हा चिमुकला त्याच्या वडिलांना सांगत आहे.

तो ज्या पद्धतीने आपल्या बाबांशी चर्चा करतोय, ते पाहून तुम्हालाही हसु आवरणार नाही. याच चिमुकल्याचा व्हिडिओ थेट आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला ज्यावर त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. जर या मुलाचे स्वप्न पुर्ण केले तर मी रस्त्यावर येईन अस आनंद महिंद्रा म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Trending Video: वाघोबाची गावात रॉयल एन्ट्री, घराच्या भिंतीवर झोपला, काही केल्या हालेना; अखेर... थरारक VIDEO

"माझ्या एका मित्राने मला हा व्हिडिओ पाठवला की तो चिकूच्या प्रेमात आहे. ...म्हणून मी त्याचे काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहिले अन् मी त्याच्या प्रेमात पडलो. पण माझी एकच अडचण आहे की त्याच्या मागणीनुसार महिंद्रा थार 700 रुपयांना विकायला सुरुवात केली तरी आपण लवकरच माझं दिवाळ निघेल.." असे आनंद महिंद्रा म्हणालेत.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत 3 लाख 46 हजार व्ह्यूज आणि सात हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत चिमुकल्याचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

Viral Video
Maratha Aarakshan: 'जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही', मराठा आरक्षणासंदर्भात गिरीष महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com