Gangappa Pujari
महिंद्रा थार गाडीची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
गाडीच्या आकर्षक, दमदार लूकमुळे ती प्रत्येकालाच आवडते.
आयुष्यात एकदा थार घ्यायचीय असं अनेकांचे स्वप्नही आहे..
तुम्हाला माहितेय का या गाडीचे डिझायन एका महिलेने तयार केले आहे...
रामकृपा अनंथन असे त्यांचे नाव आहे.. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून मास्टर ऑफ डिझाइन प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली.
त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे. अनंतन यांनी 1997 मध्ये महिंद्रामध्ये इंटीरियर डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली.
2005 मध्ये त्यांची डिझाईन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि त्या भूमिकेत त्यांनी लोकप्रिय महिंद्रा XUV 500 SUV डिझाइन केली. त्यांनी 10 वर्षे डिझाईन विभागाचे प्रमुख केले आणि नंतर त्यांना मुख्य डिझायनर म्हणून बढती मिळाली.
XUV 700 ही सुद्धा महिंद्रा कंपनीची एक दमदार आलिशान गाडी आहे. या गाडीचेही डिझायन रामकृपा अनंथन यांनी केले आहे.
थारनंतर महिंद्राची सर्वात लोकप्रिय गाडी म्हणजे स्कॉर्पिओ.. या गाडीचे डिझायनही रामकृपा अनंथन यांनी केले आहे.