Maratha Aarakshan: 'जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही', मराठा आरक्षणासंदर्भात गिरीष महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य

Girish Mahajan on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र जरांगे पाटील यांच्यावर तीवेळ कधी येणार नाही, महाजन म्हणाले आहेत.
Girish Mahajan on Maratha Reservation
Girish Mahajan on Maratha ReservationSaam Tv
Published On

>> संजय सूर्यवंशी, नांदेड

Girish Mahajan on Manoj Jarange Patil:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र जरांगे पाटील यांच्यावर तीवेळ कधी येणार नाही, त्यापूर्वी समाजाला न्याय मिळेल, असं ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले आहेत.

महाजन म्हणाले, सरकार वेगाने काम करत आहे. क्युरेटिव्ह पीटिशन मान्य झालीय. त्यातून आम्ही कोर्टाला पटवून देणार आहे की, मराठा समाज मागास कसा आहे. शिवाय मागासवर्गीय आयोग देखील आपले काम करत आहे. त्यांचा रिपोर्ट आला की, आम्ही विधानसभेचे सत्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. सरकार प्रामाणिकपणे आणि वेगाने काम करीत आहे. महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan on Maratha Reservation
India Pakistan News: ...अन्यथा काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती होईल, असं का म्हणाले फारुख अब्दुल्ला?

दरम्यान मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत. मात्र समाजाला पण मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. तोपर्यंत या समजला न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल. जरांगे पाटील किंवा समाजाला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, असं महाजन म्हणाले. (Latest Marathi News)

मोदी म्हणजे विष्णूचे तेरावे अवतार अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत. संपूर्ण देशात दिवाळी पेक्षा मोठा सण देशभरात साजरा होणार आहे. म्हणून त्यांना पोटशूळ उठल आहे. त्यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे, अशी टीका मंत्री गिरीष महाजन यांनी केली.

Girish Mahajan on Maratha Reservation
Goyal Salt Share: मीठ बनवणाऱ्या कंपनीची कमाल! 38 रुपयांचा शेअर अवघ्या अडीच महिन्यांत 150 रुपयांच्या पार

संजय राऊत हे वेगवेगळे कारण सांगत त्यांच्या बुद्धी प्रमाणे ते बोलत आहेत. आम्हाला आमंत्रण का नाही, मी हेच सांगतोय राष्ट्रीय पक्षांना आमंत्रण दिलं गेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष नाही, तर राज्याचा देखील पक्ष राहिला नाही, असा चिमटा महाजनांनी काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com