Salman Khan House Firing Case:सलमान खान गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; हरियाणातून एकाच्या मुसक्या आवळल्या, पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Salman Khan House Firing Case Update: अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला. या गोळीबारप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
Salman Khan
Salman Khan Saam Tv

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला. या गोळीबारप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. बुधावारी रात्री हरियाणातून या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई गँग आणि शुटर विकी गुप्ता (२४), सागर कुमार पलक (२१) यांच्याशी संपर्क साधला होता. हे दोघेही पोलिस कोठडीत आहेत. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

रविवारी १४ एप्रिलला सकाळी ४.५५ च्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार झाला. दोन व्यक्तीने मोटारसायकलवरुन पाच राउंड गोळीबार केला.

याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सागर कुमार पलकला गोळीबाराच्या काही तास अगोदर वांद्रे परिसरातून बंदूक पुरवण्यात आली होती. दरम्यान, बंदूक कोणी दिली होती. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन्ही आरोपी बिहारम पश्चिम चंपारण येथील आहेत. त्यांना सोमवारी रात्री उशीरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक मंदिरातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यासाठी आरोपींना ४ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यात १ लाख रुपये गोळीबार करण्याआधीच देण्यात आले होते. मुंबई क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराचा उद्देश सलमान खानच्या हत्या करण्याचा नसून त्याला घाबरवण्याचा होता.

एएनआयने याबाबत माहिती दिली आहे,आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसची माहिती मिळवली. त्यानंतर गोळीबार केला. गोळीबाराचा उद्देश हा फक्त सलमान खानला घाबरवण्याचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये दोन्ही आरोपींच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. हरियाणा आणि इतर राज्यातून ७ जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

Salman Khan
Abhradeep Saha : लोकप्रिय युट्यूबरचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वी झाली होती सर्जरी

याप्रकरणी अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी अनमोल बिश्नोई विरोधात गुन्हे शाखा एलओसी काढणार आहे. अनमोल परदेशात लपून बसल्याने त्याच्या विरोधात लूक आउट सर्क्युलर काढले जाणार आहे. एलओसी काढण्यासाठी गुन्हे शाखेने अनमोल विरोधातील गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. अन्मोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारनंतर काही तासातच अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.

Salman Khan
Nach Ga Ghuma Trailer: मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावची जुगलबंदी, 'नाच गं घुमा'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com