Cm Eknath Shinde On Salman Khan: सरकार खान कुटुंबीयांच्या पाठीशी उभं, सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Cm Eknath Shinde Meets Salman Khan: मुख्यमंत्र्यांनी सलमान खानची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.
Cm Eknath Shinde Meets Salman Khan
Cm Eknath Shinde Meets Salman KhanSaam Tv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) भेट घेतली. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आज सलमान खानची भेट घेत त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी सलमान खानची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या निवासस्थानी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सलमानसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली.

सलमान खानची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'सलमान खानची सदिच्छा भेट घेतली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी तात्काळ अटक केली. २५ तारखेपर्यंत आरोपींना पोलिस कस्टडी दिली आहे. त्यांची पूर्ण चौकशी करून सत्य बाहेर येईल. मुळापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. या प्रकरणात ते कठोर कारवाई करतील.'

Cm Eknath Shinde Meets Salman Khan
Salman Khans Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी सापडले, दोघांना गुजरातमधून अटक

तसंच, 'या प्रकरणामध्ये कोण आहे त्याचा शेवटपर्यंत पोलिस शोध घेतील. अशाप्रकारची हिंमत परत कोणी करता कामा नये अशाप्रकारची जरप पोलिस त्यांच्यावर बसलतील. त्याचबरोबर सलमान खान आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. सलमान खानला भेटलो आणि त्याला दिलासा दिला आहे. सरकार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभं आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेईल.', असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Cm Eknath Shinde Meets Salman Khan
Sharad Pawar Sabha: ना पावसाची भीती, ना उन्हाचा ताण! शरद पवार पेटवणार निवडणुकीचा रान; २२ दिवसांत घेणार ५० सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com