Nach Ga Ghuma Trailer: मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावची जुगलबंदी, 'नाच गं घुमा'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Nach Ga Ghuma Movie Trailer Released: 'नाच गं घुमा' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'नाच गं घुमा' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Nach Ga Ghuma Marathi Movie Trailer
Nach Ga Ghuma Marathi Movie TrailerSaam Tv

Nach Ga Ghuma Movie Trailer Out

'वाळवी'च्या यशानंतर परेश मोकाशी 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve)आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, टायटल साँग, गडबड गीत आणि टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. हे पाहिल्यानंतर प्रेक्षक ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. 'नाच गं घुमा' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'नाच गं घुमा' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

नाच गं घुमा या चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करत मुक्ता बर्वेने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी ⁠तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, आशा आणि राणी सांगणार…‘नाच गं घुमा’चा ट्रेलर आलाय!!!हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात...' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात मुक्ता बर्वेपासून होते. आशाताईंना कामावरून काढून टाकले असे ती तिच्या नवऱ्याला सांगते. त्यानंतर कामवालीमुळे घरामध्ये होणारा वाद, तिला कामावरून काढून टाकल्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. नवीन कामवालीला शोधण्यामध्ये राणी आणि तिच्या कुटुंबाची कशी पंचायत होते हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Nach Ga Ghuma Marathi Movie Trailer
Aamir Khan Deepfake Video: आमिर खान ठरला डिपफेकचा बळी, राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव

प्रत्येकाच्या आसपासचे संवाद पण तरीही ते मनोरंजन करून जातात. मोलकरीण हा म्हटला तर छोटा पण कधी कधी तो सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो. याच गोष्टी या ट्रेलरमधून दिसून येतात आणि मोलकरून रजेवर गेली किंवा काम सोडून गेली तर काय धर्मसंकट ओढवते त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार या ट्रेलरमधून दिसतात आणि त्यातूनही एका सशक्त कथेची आणि तेवढ्याच दर्जेदार अभिनयाची चुणूक दिसून येते. घरातील कामवाली ज्या गोष्टी लीलया करते, त्या करताना आपली कशी त्रेधा तिरपीट उडते आणि घराचा कसा विचका उडतो, या गोष्टी या ट्रेलरमधून समोर येतात.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते, या वाक्याने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात झाली होती आणि ट्रेलरमध्ये ही गोष्ट अगदी खरी ठरताना दिसत आहे. या चित्रपाटच्या ट्रेलरमध्ये मुक्ता आणि नम्रता यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्याचसोबत चिमुकल्या मायरा वायकुळने देखील ट्रेलरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. इतर कलाकारांचा अभिनय देखील उत्तमच आहे.

Nach Ga Ghuma Marathi Movie Trailer
Deepika Padukone Embroidery Work: गरोदरपणात दीपिका पदुकोण काय करतेय?, फोटो शेअर करत दाखवली झलक

'नाच गं घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी असून या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी , मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत मुख्य भू्मिकेत आहे. तर या चित्रपटामध्ये बालकलाकार मायरा वायकुळही दिसणार आहे. या चित्रपटाची कथा महाराणी- परीराणीची या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्त्रियांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Nach Ga Ghuma Marathi Movie Trailer
Arun Govil And Dipika Chikhlia New Film: ‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार, जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com