Aamir Khan Deepfake Video: आमिर खान ठरला डिपफेकचा बळी, राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्याने घेतली पोलिसांत धाव

Aamir Khan Viral Video: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानही डीपफेक व्हिडीओचा बळी पडला आहे. त्या व्हिडीओमुळे अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली आहे.
Aamir Khan Deepfake Video
Aamir Khan Deepfake VideoInstagram

Aamir Khan Deepfake Viral Video

एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) बनवण्याचे प्रकार काही थांबायचे नाव घेत नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेल्या डीपफेक व्हिडीओचे (Deepfake Video) अनेक दिग्गज मंडळी बळी पडले आहेत. यामध्ये सेलिब्रिटी मंडळींचाही समावेश आहे.

अशातच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानही डीपफेक व्हिडीओचा बळी पडला आहे. सध्या सर्वत्र देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धुमधाम सुरू आहे. अशातच, अभिनेता एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्या व्हिडीओचा आणि निवडणूकीचा कुठलाही संबंध नसतानाही व्हिडीओ शेअर केल्याने अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली आहे.

Aamir Khan Deepfake Video
Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर आमिर खान एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतला कंटेंट वेगळा आहे. पण त्या व्हिडीओचा एका राजकीय पक्षासोबत संबंध जोडलेला दिसतोय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा आवाज डब केल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली आहे. त्याने तात्काळ पोलिस स्थानकांत FIR दाखल केली आहे. या प्रकरणी अभिनेत्याचे, अधिकृत वक्तव्यही समोर आलेले आहे. (Viral Video)

या प्रकरणी अभिनेत्याने सांगितले की, " माझ्या ३५ वर्षांच्या सिनेकारकिर्दित कधीही मी कोणत्या राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नाही." या प्रकरणी अभिनेत्याने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये आपली तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींवर काय कारवाई केली जाणार ?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आमिर खानच्या आधी रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट, नोरा फतेही, अक्षय कुमार, सोनू सूद, कतरिना कैफ आणि काजोलसह अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओची शिकार झाले आहेत.

Aamir Khan Deepfake Video
Swargandharva Sudhir Phadke: ‘जे माझ्या मनाला भावतं, ते माझ्या संगीतातून आणि गळ्यातून उतरतं...’; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com