Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या; पक्षाचा प्रचार करून परतताना नक्षलवाद्यांनी केली निर्घृण हत्या

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे
BJP
BJP saam tv

Chhattisgarh Crime News:

छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यादरम्यान मोठी घातपाताची घटना घडली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची धारदार शस्त्राने हत्या केली. प्रचार करून परतताना रतन दुबे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, छत्तीसगडच्या नारायणपूरच्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची कौशलनगर येथे नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे. ते भाजप जिल्हा उपाध्यक्षासहित एका वाहतूक संघटनेचेही जिल्हा उपाध्यक्ष होते. कौशलनगर बाजारात भाजपचा प्रचार करून परतताना नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP
Rajasthan Election: राजस्थानमध्ये भाजपला धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष; काय आहे कारण

दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी नारायणपूर येथे विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. भाजप नेत्याची हत्या झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी मानपूर-मोहला येथे भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती.

नक्षलग्रस्त भागात भाजप नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. यामुळे भाजप नेत्यांकडून सुरक्षेची मागणी केली जात आहे.

BJP
ISRO Chief: सिवन यांना एस सोमनाथ नको होते इस्रोचे प्रमुख; आत्मकथेवरुन वाद होताच सोमनाथ यांनी दिलं स्पष्टीकरण

या घटनेवर पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं की, 'शनिवारी सांयकाळी साडे पाच वाजता रतन दुबे हे झारघाटी पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर दूर कौशलनगर गावात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्र्याच्या मदतीने दुबे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी पोहोचले'.

BJP
Chetak Helicopter Crash: टेकऑफ करताना नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं, अपघातात एकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com