Chetak Helicopter Crash: टेकऑफ करताना नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं, अपघातात एकाचा मृत्यू

Chetak helicopter : आयएनएस गरुड या हवाई स्टेशनच्या धावपट्टीवर रुटीन ट्रेनिंग ड्रिलच्या दरम्यान चेतक हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
Chetak Helicopter
Chetak HelicopterSocial Media (संग्रहित छायाचित्र)
Published On

Chetak Helicopter Crash:

केरळमधील कोचीमध्ये नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय. कोचीमधील आयएनएस गरुड या हवाई स्टेशनच्या धावपट्टीवर रूटीन ट्रेनिंग ड्रिलच्या दरम्यान चेतक हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दुर्घटना झाली तेव्हा या हेलिकॉप्टरमध्ये दोन क्रू मेंबर्स बसलेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रूचा मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती भारतीय नौदलाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलीय. (Latest News)

हेलिकॉप्टरचा अपघात कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी एका चौकशी मंडळ स्थापित करण्यात आलंय. दरम्यान बुधवारी भारती नौदलाकडून बंगालच्या खाडीमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं होतं. हे क्षेपणास्त्र परीक्षण सर्वा उद्देशांवर खरं उतरलं. याविषयीची माहिती नौदलाने आपल्या या सोशल मीडियावर साईटवर एक्स आधीच्या ट्विटरवर दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मागील मंगळवारी नौदलातील इल्यूशियन ३८ सी ड्रॅगन नावाच्या विमानाला सेवा निवृत्त करण्यात आलं होतं. हे विमान समुद्र किनाऱ्यावर देखरेख केली जात होती. या विमानाने ४६ वर्ष सेवा केलीय. या विमानाचा निरोप समारोह हा गोवाच्या डाबोलिममध्ये आयएनएस हंसावर आयोजित करण्यात आलं होतं. या समारोहासाठी नौदल प्रमुख एडमिरल आर हरी कुमार, आयएल ३८ स्क्वाड्रनचे वरिष्ठ अधिकारी आणि सैनिक इतर मान्यवर व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com