Rajasthan Election: राजस्थानमध्ये भाजपला धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष; काय आहे कारण?

Yunus Khan quits BJP: राजस्थानमध्ये भाजपला धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष; काय आहे कारण
Rajasthan Election
Rajasthan ElectionSaam Tv
Published On

Yunus Khan quits BJP:

राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय माजी मंत्री युनूस खान यांनी भाजप सोडण्याची घोषणा केली आहे. नागौर जिल्ह्यातील दिडवाना येथून तिकीट न मिळाल्याने ते संतापले होते. युनूस खान हे वसुधरा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

त्यांनी 2018 मध्ये टोंकमधून सचिन पायलट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी वसुंधरा राजेंचे निकटवर्तीय माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत, युनूस खान आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाने तिकीट दिलेले नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Election
Elvish Yadav Arrest: एल्विश यादवला पोलिसांनी घेतलं ताब्यात, सापाच्या विषाची तस्करी करण्याचा आरोप

तिकीट न मिळाल्याने युनूस खान नाराज होते. राजस्थान भाजपचा मोठा मुस्लिम चेहरा युनूस खान यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करू शकते. युनूस खान यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

खान यांनी आज दिडवाना येथे कार्यकर्त्यांनी बोलावलेल्या बैठकीत या दोन्ही घोषणा केल्या. युनूस खान यांच्या या घोषणेनंतर आता डिडवानामधील राजकीय समीकरण बदलू शकते. युनूस खान यांना भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता होती, मात्र असे झालेले नाही.

Rajasthan Election
Mark Zuckerberg Injury: मार्शल आर्ट्स आलं अंगाशी, मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

कोण आहेत युनूस खान?

युनूस खान हे राजस्थान भाजपचे प्रमुख अल्पसंख्याक चेहरा आहेत. ते सलग दोन वेळा डिडवाना येथून भाजपचे आमदार राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सचिन पायलट यांच्या विरोधात भाजपने युनूस खान यांना टोंकमधून उमेदवारी दिली होती. टोंक हे अल्पसंख्याक बहुल क्षेत्र आहे. पण खान यांना पायलटविरुद्ध निवडणूक जिंकता आली नाही. युनूस खान हे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील राजे सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com